Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

IPL च्या ‘त्या’ खास विक्रमावर ड्वेन ब्राव्होच्या नजरा; करणार मोठा चमत्कार

मुंबई – आयपीएलच्या 15 व्या (IPL 2022) मोसमातील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) यांच्यात होणार आहे. शनिवारी (26 मार्च) मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर दोन्ही संघांमध्ये सामना रंगणार आहे. या सामन्यात चेन्नईचा अनुभवी गोलंदाज ड्वेन ब्राव्होला (Dwayne Bravo) आपल्या नावावर एक खास विक्रम करण्याची संधी असेल. तो आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनू शकतो.

Advertisement

मुंबई इंडियन्सचा माजी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाचा विक्रम ब्राव्होच्या निशाण्यावर आहे. मलिंगाने आयपीएलमध्ये 170 विकेट घेतल्या आहेत. ब्राव्हो त्याच्यापासून तीन विकेट्स दूर आहे. या मोसमात मलिंगा राजस्थान रॉयल्सचा गोलंदाजी प्रशिक्षक आहे. दुसरीकडे, 38 वर्षीय ब्राव्होला चेन्नई संघाने लिलावात 4 कोटी रुपयांना खरेदी केले. ब्राव्होने आयपीएलमध्ये आतापर्यंत 167 विकेट घेतल्या आहेत.

Advertisement

T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम ब्राव्होच्या नावावर आहे. त्याने 522 सामन्यात 571 विकेट घेतल्या आहेत. त्याच्याकडे दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या इम्रान ताहिरपेक्षा 120 बळी जास्त आहेत. भारताचे फिरकीपटू पियुष चावला आणि अमित मिश्रा यांना मलिंगाला मागे टाकण्याची संधी होती, पण यावेळी दोघांनाही कोणत्याही संघाने विकत घेतले नाही. मिश्राने गेल्या मोसमात चार सामन्यांत सहा विकेट घेतल्या होत्या. आयपीएलमध्ये त्याच्या एकूण 166 विकेट्स आहेत.

Loading...
Advertisement

खरेदिवाला सर्वांसाठी..! ऑफर आणि लव्ह एनकॅशसाठी आजच Kharediwala वर जाऊन आपल्या प्रियजनांना भेटवस्तू पाठवा

Advertisement

दुसरीकडे चावलाला गेल्या मोसमात मुंबई इंडियन्सकडून सामना खेळण्याची संधी मिळाली. त्याला संघाने 2 कोटी रुपयांना विकत घेतले. चावलाच्या नावावर आयपीएलमध्ये 157 विकेट आहेत. मुंबई इंडियन्सचा माजी गोलंदाज हरभजन सिंग 150 विकेट्ससह पाचव्या क्रमांकावर आहे. ब्राव्होने गेल्या वर्षी 11 सामन्यात 14 बळी घेतले होते. माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी डेथ ओव्हर्समध्ये त्याचा वापर करायचा. आता रवींद्र जडेजा ब्राव्होचा कसा वापर करतो ते पाहायचे आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply