Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

IPL 2022: क्रिकेटचा महाकुंभ आजपासून सुरू; जाणुन घ्या संपूर्ण माहिती फक्त एका क्लिकवर

मुंबई – क्रिकेटचा महाकुंभ आयपीएलच्या 15वा सीझन (IPL 2022) आजपासून सुरू होत आहे. हा हंगाम 10 संघांच्या व्यासपीठासह सज्ज आहे. पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) यांच्यात होणार आहे. दोन्ही संघांचे नेतृत्व नवीन कर्णधाराकडे आहे. या हंगामात केकेआरची कमान युवा फलंदाज श्रेयस अय्यरकडे (Shreyas Iyer) आहे आणि यावेळी सीएसकेने अष्टपैलू रवींद्र जडेजाकडे (Ravindra Jadeja) नेतृत्व सोपवले आहे.

Advertisement

विशेष म्हणजे गेल्या मोसमात या दोन संघांमध्ये अंतिम सामना झाला होता. ज्यामध्ये CSK ने KKR चा पराभव करून चौथ्यांदा विजेतेपद पटकावले. दोन्ही संघांना नव्या नेतृत्वासह चांगली सुरुवात करायची आहे. कोलकातालाही नवा संघ संतुलन शोधावा लागेल. आयपीएलचा चालू हंगाम सुरू होण्यापूर्वीच चेन्नई सुपर किंग्जला दोन मोठे धक्के बसले आहेत.

Advertisement

खरेदिवाला सर्वांसाठी..! ऑफर आणि लव्ह एनकॅशसाठी आजच Kharediwala वर जाऊन आपल्या प्रियजनांना भेटवस्तू पाठवा

Loading...
Advertisement

चेन्नई सुपर किंग्जचा CSK वेगवान गोलंदाज दीपक चहर दुखापतीमुळे सुरुवातीच्या सामन्यांमधून बाहेर पडला आहे. दीपक हा चेन्नईसाठी महत्त्वाचा खेळाडू आहे. दीपकला विकत घेण्यासाठी चेन्नईने 14 कोटी रुपये खर्च केले. भारत आणि वेस्ट इंडिज मालिकेदरम्यान दीपकला दुखापत झाली होती. त्यानंतर तो लवकरच दुखापतीतून सावरण्याचा प्रयत्न करत आहे.

Advertisement

दीपक चहरकडे नवीन चेंडूवर विकेट घेण्याची तसेच चेन्नईसाठी खालच्या क्रमवारीत झटपट धावा काढण्याची क्षमता आहे, सीएसकेला सुरुवातीच्या सामन्यांमध्ये दीपकची नक्कीच उणीव भासेल. तर दुसरीकडे, इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अलीही व्हिसा मिळण्यास उशीर झाल्यामुळे चेन्नई संघात उशिरा सामील होऊ शकला. या अष्टपैलू खेळाडूमध्ये विकेट घेण्यासोबतच झटपट धावा काढण्याची क्षमताही आहे. दीपकसोबत मोईन अलीही कोलकाताविरुद्धच्या पहिल्या सामन्यात खेळू शकणार नाही.

Advertisement
Advertisement

Leave a Reply