Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

WC: भारताला धक्का; उपांत्य फेरीचे गणित बिघडले; जाणुन घ्या नवीन समीकरणे

मुंबई – महिला विश्वचषक स्पर्धेत (ICC Woman’s Cricket World Cup) भारतासाठी (Team India) उपांत्य फेरीचा रस्ता कठीण झाला आहे. इंग्लंडचा (England) पाकिस्तानविरुद्धचा (Pakistan) मोठा विजय आणि दक्षिण आफ्रिका-वेस्ट इंडिज (South Africa VS West Indies) सामना रद्द झाल्याने भारत आता अडचणीत सापडला आहे. आता उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी भारताला कोणत्याही परिस्थितीत शेवटचा सामना जिंकावाच लागेल. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताचा पराभव झाला तर उपांत्य फेरी गाठण्याच्या भारताच्या आशा जवळपास संपुष्टात येतील. हा कठीण सामना जिंकल्यानंतर टीम इंडिया उपांत्य फेरीत पोहोचणारा चौथा संघ बनू शकतो.

Advertisement

ऑस्ट्रेलियानंतर दक्षिण आफ्रिकेने उपांत्य फेरीत धडक मारली असून उर्वरित दोन स्थानांसाठी भारत, वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यात सामना होणार आहे. इंग्लंड आणि भारत जिंकल्यास हे दोन्ही संघ उपांत्य फेरीत पोहोचतील. दुसरीकडे, या दोघांपैकी एकाचा पराभव झाल्यास वेस्ट इंडिजचा संघ उपांत्य फेरीत पोहोचेल.

Advertisement

खरेदिवाला सर्वांसाठी..! ऑफर आणि लव्ह एनकॅशसाठी आजच Kharediwala वर जाऊन आपल्या प्रियजनांना भेटवस्तू पाठवा

Advertisement

उपांत्य फेरीचे गणित काय आहे?
या विश्वचषकात भारताने सहा पैकी तीन सामने जिंकले असून गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. भारताचा शेवटचा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आहे. आता भारताला उपांत्य फेरी गाठण्यासाठी तीन परिस्थिती आहेत.

Loading...
Advertisement

1. जर भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला त्यांच्या शेवटच्या साखळी सामन्यात पराभूत केले तर भारताचे आठ गुण होतील आणि हा संघ उपांत्य फेरीत पोहोचेल. इंग्लंडचा शेवटचा सामना बांगलादेशविरुद्ध आहे, जिथे त्यांचा विजय जवळपास निश्चित आहे. अशा स्थितीत ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, भारत आणि इंग्लंड उपांत्य फेरीत पोहोचतील आणि वेस्ट इंडिजचा संघ बाहेर पडेल.

Advertisement

2. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध हरल्यास भारताला चमत्काराची अपेक्षा करावी लागेल. अशा परिस्थितीत दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवाचे अंतर जास्त राहू नये यासाठी टीम इंडिया प्रयत्न करेल. दुसरीकडे, इंग्लंडचा बांगलादेशकडून मोठ्या फरकाने पराभव झाला तर या स्थितीत भारताचा धावगती इंग्लंडपेक्षा चांगला असेल आणि ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, भारत आणि वेस्ट इंडिज हे संघ उपांत्य फेरीत पोहोचतील. तथापि, हे घडण्याची शक्यता अत्यंत कमी आहे.

Advertisement

3. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्यात पाऊस पडल्यास भारताचे सात गुण होतील. या स्थितीत इंग्लंडचा संघ बांगलादेशकडून हरेल आणि भारत उपांत्य फेरीत पोहोचेल, अशी प्रार्थना भारत करेल.

Advertisement
Advertisement

Leave a Reply