Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

‘या’ दोन फलंदाजांनी केला अनोखा विक्रम; 137 वर्षांनी कसोटी इतिहासात घडली अशी आश्चर्यकारक गोष्ट

मुंबई – इंग्लंड आणि वेस्ट इंडिज (England vs West Indies) यांच्यातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना ग्रेनाडा येथे खेळला जात आहे. गुरुवारी (24 मार्च) सामन्याच्या पहिल्या दिवशी वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय योग्य ठरला. वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी इंग्लंडचा डाव 204 धावांत गुंडाळला. इंग्लिश संघाकडून पहिल्या डावात शाकिब महमूदने 49 आणि जॅक लीचने 41 धावा केल्या.

Advertisement

इंग्लंडचा संघ पहिल्या डावात 114 धावांवर नऊ विकेट्स गमावून एकवेळ संघर्ष करत होता. इंग्लिश संघ स्वस्तात ऑलआऊट होईल असे वाटत होते. येथून जॅक लीच आणि साकिब महमूदने डावाची धुरा सांभाळली. दोघांनी 10व्या विकेटसाठी 90 धावांची भागीदारी केली. दिवसाच्या शेवटच्या षटकात महमूद बाद झाला. त्याचा अर्धशतक एका धावेने हुकला. जर्मेन ब्लॅकवूडचा चेंडू त्याच्या बॅटला लागून विकेट्समधून गेला. जॅक लीच 41 धावांवर नाबाद राहिला

Advertisement

साकिब महमुदूने पहिल्या डावात संघाकडून सर्वाधिक धावा केल्या होत्या. पहिल्या क्रमांकावर उतरलेल्या अॅलेक्स लीसने 31 धावा केल्या. त्याचवेळी 11व्या क्रमाने खेळणाऱ्या शाकिबने 49 धावा केल्या. कसोटी इतिहासात 137 वर्षांनंतर असे घडले आहे जेव्हा 10 आणि 11 क्रमांकाच्या फलंदाजाने इतर नऊ फलंदाजांपेक्षा जास्त धावा केल्या. हे 1885 मध्ये घडले. त्यानंतर इंग्लंडच्या टॉम गॅरेट आणि एडविन इव्हान्स यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध 10व्या आणि 11व्या क्रमवारीत खेळताना डावात इतर फलंदाजांपेक्षा जास्त धावा केल्या.

Loading...
Advertisement

खरेदिवाला सर्वांसाठी..! ऑफर आणि लव्ह एनकॅशसाठी आजच Kharediwala वर जाऊन आपल्या प्रियजनांना भेटवस्तू पाठवा

Advertisement

वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटीबद्दल बोलायचे झाले तर पहिल्या डावात सहा फलंदाजांना दुहेरी आकडा गाठता आला नाही. कर्णधार जो रूट आणि जॉनी बेअरस्टो यांना खातेही उघडता आले नाही. साकिब महमूद आणि जॅक लीच त्यानंतर अॅलेक्स लीस (31), ख्रिस वोक्स (25), क्रेग ओव्हरटन (14), डॅनियल लॉरेन्स (आठ), बेन फॉक्स (7), जॅक क्रॉली (7) आणि बेन स्टोक्स (2) यांचा क्रमांक लागतो. वेस्ट इंडिजकडून जेडेन सील्सने सर्वाधिक तीन बळी घेतले. केमार रोच, काइल मेयर्स आणि अल्झारी जोसेफ यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. जर्मेन ब्लॅकवुडला ब्रेकथ्रू मिळाला.

Advertisement
Advertisement

Leave a Reply