मुंबई : आयपीएल क्रिकेट स्पर्धा सुरू होणार आहेत. मात्र, त्याआधी जवळपास सर्व संघांना एकाच प्रकारच्या समस्येचा सामना करत आहेत. यावेळी सुरुवातीलात परदेशी खेळाडूंच्या उपस्थितीबाबत प्रश्न निर्माण होत आहेत. सध्या चेन्नई सुपर किंग्जपासून ते लखनऊ सुपर जायंट्सपर्यंत या प्रकरणाने जवळपास प्रत्येक संघ अडचणीत आणला आहे. पंजाब किंग्जच्या अडचणी वाढल्या आहे, संघाच्या पहिल्याच सामन्यात दोन परदेशी खेळाडू नाहीत. कागिसो रबाडा आणि जॉनी बेअरस्टो हे दोन्ही दिग्गज खेळाडू पहिल्या सामन्यासाठी उपलब्ध नाहीत.
रविवारी 27 मार्च रोजी नवी मुंबईत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्धच्या पहिल्या सामन्यात पंजाब किंग्ज आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. मात्र, संघाचे हे दोन्ही दिग्गज परदेशी खेळाडू या सामन्यासाठी उपलब्ध होणार नाहीत. हे दोन्ही दिग्गज आपापल्या राष्ट्रीय संघांच्या मालिकेत असल्यामुळे त्यांना अद्याप येथे येता आलेले नाही आणि अशा परिस्थितीत त्यांचा पहिला सामन्याची शक्यता संपुष्टात आली आहे. तसेच आयपीएलमधील अन्य संघांनाही अशाच अडचणींचा सामना करावा लागत आहे.
आयपीएल स्पर्धा येत्या रविवारपासून सुरू होणार आहे. मागील आयपीएलवेळी कोरोनाचा प्रादुर्भाव होता. त्यामुळे या स्पर्धेत अडचणी आल्या. काही सामने देशाबाहेर आयोजित करावे लागले. यावेळी मात्र असे होण्याची शक्यता सध्या तरी दिसत नाही. कारण, कोरोना प्रसार बऱ्यापैकी आटोक्यात आला आहे. कोरोना निर्बंधही कमी होत आहेत. त्यामुळे यावेळी अडचणी निर्माण होण्याची शक्यता कमी आहे. दुसरीकडे आयपीएल संघांनीही जोरदार तयारी सुरू केली आहे.