Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

PAK vs AUS: स्टीव्ह स्मिथने मोडला श्रीलंकेच्या ‘या’ दिग्गज खेळाडूचा ‘तो’ मोठा विक्रम

मुंबई – ऑस्ट्रेलियाचा (Australia) स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथने (Steve Smith) एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 8000 धावा करणारा तो खेळाडू ठरला आहे. लाहोरमध्ये खेळल्या जात असलेल्या पाकिस्तानविरुद्धच्या (Pakistan) तिसऱ्या कसोटी सामन्यात त्याने श्रीलंकेचा दिग्गज कुमार संगकाराचा (Kumar Sangakkara) 12 वर्ष जुना विश्वविक्रम मोडला.

Advertisement

32 वर्षीय स्मिथने त्याच्या 151व्या डावात (85 कसोटी) हा विशेष आकडा गाठला, तर संगकाराने 152 डावांमध्ये हा पराक्रम केला. या यादीत भारतीय दिग्गज सचिन तेंडुलकर (154 डाव), गॅरी सोबर्स (157 डाव) आणि राहुल द्रविड (158 डाव) अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत.

Advertisement

आपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना..? मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा

Loading...
Advertisement

मात्र, लाहोर कसोटीत स्मिथची कामगिरी विशेष ठरली नाही आणि त्याने या सामन्यात केवळ एक अर्धशतक झळकावले. त्याने पहिल्या डावात 169 चेंडूत 59 धावा केल्या तर दुसऱ्या डावात 27 चेंडूत फक्त 17 धावा केल्या. तिसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने आपला दुसरा डाव 227/3 धावांवर घोषित केला आणि पाकिस्तानसमोर विजयासाठी 351 धावांचे लक्ष्य ठेवले.

Advertisement

स्मिथच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर त्याने 85 सामन्यांच्या 151 डावांमध्ये 59.77 च्या सरासरीने 8010 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 27 शतके आणि 36 अर्धशतकेही केली आहेत.

Advertisement
Advertisement

Leave a Reply