मुंबई – चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) अष्टपैलू खेळाडू मोईन अलीला (Moeen Ali) भारताचा व्हिसा मिळाला असून तो मुंबईत पोहोचला आहे. मात्र, तो पहिल्या सामन्यात उपलब्ध होणार नाही. इंग्लंडचा क्रिकेटपटू मोईनला संघात येण्यापूर्वी येथे तीन दिवसांचे क्वारंटाईन पूर्ण करावे लागणार आहे. CSK चे सीईओ काशी विश्वनाथन (Kashi Vishwanath) यांनी सांगितले की, मोईन भारतात पोहोचला आहे आणि लवकरच संघात सामील होईल. त्याला नियमानुसार क्वारंटाईन केले जाईल आणि त्यानंतर दुसऱ्या सामन्यात तो निवडीसाठी उपलब्ध असेल.
मोईन हा पाकिस्तानी वंशाचा इंग्लिश क्रिकेटर असल्याने नियम आणि प्रक्रियेमुळे त्याला विलंब झाला.
आपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना..? मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा
चार वेळच्या विजेत्या चेन्नई सुपर किंग्जने गेल्या मोसमात कोलकाता नाईट रायडर्सचा अंतिम फेरीत पराभव केला. यावेळी 26 मार्च (शनिवार) रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर लीगच्या पहिल्या सामन्यात दोन्ही संघ एकमेकांशी भिडतील. गतविजेत्या सीएसकेचा दुसरा सामना लखनऊ सुपर जायंट्ससोबत होणार आहे.
मोईनच्या अष्टपैलू खेळामुळे त्याला चेन्नईने लिलावापूर्वी कायम ठेवले होते. मोईनने गेल्या मोसमात 15 डावात 357 धावा केल्या होत्या. याशिवाय त्याने सहा विकेट्सही घेतल्या. चेन्नईला चौथ्यांदा चॅम्पियन बनवण्यात मोईनचा मोलाचा वाटा होता.