Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

अर्र..रोहित शर्माला ICC ने दिला धक्का; रोहीतचा झाला मोठा नुकसान

मुंबई – आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) बुधवारी जाहीर केलेल्या ताज्या पुरुष एकदिवसीय खेळाडूंच्या क्रमवारीत भारतीय (ICC Man’s ODI Ranking) कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) फटका बसला आहे. ताज्या क्रमवारीत रोहितची एका स्थानाने घसरण होऊन चौथ्या क्रमांकावर आला आहे. त्याचे सध्या 791 रेटिंग गुण आहेत. त्याचवेळी विराट कोहली (Virat Kohli) दुसऱ्या स्थानावर कायम आहे. विराटचे 811 रेटिंग गुण आहेत. ताज्या ICC एकदिवसीय क्रमवारीत अव्वल-10 फलंदाजांच्या यादीत विराट आणि रोहित हे दोनच भारतीय फलंदाज आहेत.

Advertisement

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम 873 रेटिंगसह अव्वल स्थानावर आहे. त्याच्याशिवाय बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 41 चेंडूत 62 धावांची खेळी करणारा क्विंटन डी कॉक तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याचा देशबांधव रासी व्हॅन डर ड्युसेननेही दोन स्थानांची सुधारणा करून सहाव्या क्रमांकावर आहे.

Loading...
Advertisement

Kharediwala फॉर एव्हरीवन..! होय, आता आम्ही घेऊन आलोय आलेय इंडियन ईकॉमर्स..!

Advertisement

गोलंदाजांच्या यादीत जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) हा एकमेव भारतीय गोलंदाज आहे, ज्याचा टॉप-10 मध्ये समावेश आहे. बुमराह 679 रेटिंगसह सहाव्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट 737 रेटिंगसह अव्वल स्थानावर आहे. गोलंदाजांच्या यादीत टॉप-7 मध्ये कोणताही बदल झालेला नाही. मात्र बांगलादेशविरुद्ध कारकिर्दीत दुसऱ्यांदा पाच बळी घेणारा दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाने पाच स्थानांनी झेप घेत आठव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. रबाडाचे 658 रेटिंग गुण आहेत.

Advertisement
Advertisement

Leave a Reply