Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

तुम्ही IPL पाहण्यासाठी मैदानात जाणार असेल तर थांबा; अन् वाचा BCCI चा ‘हा’ मोठा निर्णय

मुंबई – इंडियन प्रीमियर लीगच्या 15व्या (IPL 2022) हंगामाला शनिवारपासून (26 मार्च) सुरुवात होत आहे. गतवर्षीचा विजेता चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि उपविजेता कोलकाता नाईट रायडर्स (KKR) यांच्यातील पहिला सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर (Wankhede stadium) होणार आहे. तत्पूर्वी आयोजकांकडून प्रेक्षक आणि चाहत्यांना आनंदाची बातमी देण्यात आली होती.

Advertisement

आयोजकांनी बुधवारी सांगितले की, स्टेडियमच्या एकूण क्षमतेच्या 25 टक्के स्टेडियममध्ये प्रवेश करण्यास परवानगी देण्यात आली आहे. म्हणजेच यावेळी चाहत्यांना स्टेडियमवर पोहोचून आपापल्या टीमला सपोर्ट करता येणार आहे.आजपासून तिकिटांची विक्री सुरू झाली असून, चाहत्यांना ऑनलाइन तिकीट बुक करता येणार आहे.

Advertisement

“हा सामना एक महत्त्वाचा प्रसंग असेल कारण IPL साथीच्या रोगामुळे थोड्याशा विश्रांतीनंतर स्टेडियममध्ये पुन्हा चाहत्यांचे स्वागत करेल,” असे आयपीएलच्या प्रकाशनात म्हटले आहे.

Loading...
Advertisement

प्रसिद्धीनुसार, मुंबई, नवी मुंबई आणि पुणे येथील स्टेडियममध्ये सामने खेळवले जातील, ज्यामध्ये स्टेडियमच्या क्षमतेच्या 25 टक्के लोक कोविड-19 प्रोटोकॉलनुसार स्टेडियममध्ये बसून सामना पाहू शकतील.

Advertisement

Kharediwala फॉर एव्हरीवन..! होय, आता आम्ही घेऊन आलोय आलेय इंडियन ईकॉमर्स..!

Advertisement

आयपीएलमध्ये लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स या दोन नवीन संघांच्या समावेशामुळे या हंगामातील संघांची संख्या 10 झाली आहे आणि यामुळे या हंगामातील एकूण सामन्यांची संख्याही 74 झाली आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply