Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

लखनऊच्या अडचणीत वाढ: ‘त्या’ गोलंदाजालाही NOC नाही; मार्क वुडला करणार होता रिप्लेस

मुंबई – लखनौ सुपर जायंट्सच्या (LSG) अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाहीये. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वुड (Mark Wood) बाहेर झाल्यानंतर त्याची जागा घेणारा बांगलादेशचा वेगवान गोलंदाज तस्किन अहमद (Taskin Ahmed) इंडियन प्रीमियर लीग (IPL) फ्रँचायझी लखनौ सुपर जायंट्सच्या संघाचा भाग बनू शकणार नाही कारण बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) त्याला ना हरकत प्रमाणपत्र (NOC) देण्यास नकार दिला आहे.

Advertisement

स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, 26 वर्षीय तस्किनला कोपराच्या दुखापतीमुळे बाहेर पडल्यानंतर सुपर जायंट्सने त्याच्याशी संपर्क साधला होता. आयपीएलमध्ये भाग घेण्यासाठी तस्किनला ना-हरकत प्रमाणपत्र देण्यास BCB ने नकार दिला . सध्या बांगलादेश दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे.

Advertisement

‘क्रिकबझ’नुसार, बीसीबी क्रिकेट ऑपरेशन्सचे प्रमुख जलाल युनूस म्हणाले की “आम्हाला सध्याच्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यानंतर श्रीलंकेविरुद्ध घरची मालिका खेळायची आहे, त्यामुळे आम्हाला वाटते की त्याच्यासाठी या (IPL) स्पर्धेत भाग घेणे योग्य होणार नाही.”

Loading...
Advertisement

बांगलादेश क्रिकेट संघ सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे, जिथे तो सध्या एकदिवसीय मालिका खेळत आहे. यानंतर 11 एप्रिलपर्यंत दोन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे, तर IPL 26 मार्चपासून सुरू होणार आहे.
Kharediwala फॉर एव्हरीवन..! होय, आता आम्ही घेऊन आलोय आलेय इंडियन ईकॉमर्स..!

Advertisement

पुढे युनूस म्हणाले की, “आम्ही तस्किनशी बोललो आणि त्याला संपूर्ण परिस्थिती समजली आहे. त्याने फ्रँचायझीला कळवले आहे की तो आयपीएलमध्ये खेळू शकणार नाही आणि दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी आणि नंतर मायदेशी खेळण्यासाठी उपलब्ध असेल.

Advertisement
Advertisement

Leave a Reply