मुंबई – आयपीएल 2022 (IPL 2022) सुरू होण्यासाठी काही दिवस शिल्लक आहेत आणि सर्व संघ त्यांच्या तयारीत व्यस्त आहेत. यावेळी या लीगमध्ये लखनौ (Lucknow) आणि गुजरात (Gujarat) हे दोन नवे संघ सामील झाले आहेत. लखनौ संघाचे कर्णधारपद लोकेश राहुलकडे (K.L.Rahul) आहे, तर हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) गुजरातचे कर्णधार बनवण्यात आले आहे. लखनौच्या संघात येण्यापूर्वी राहुल पंजाबचा कर्णधार होता, पण मेगा लिलावापूर्वी (Mega Auction) राहुलने पंजाबच्या (Punjab) संघातून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयावर सर्वांनीच प्रश्न उपस्थित केले होते, आता राहुल यांनी या प्रकरणावर उघडपणे बोलले आहे.
मेगा लिलावापूर्वी सर्व संघांनी त्यांच्या कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली होती. पंजाबने सर्वात कमी खेळाडूंना कायम ठेवले. सलामीवीर मयंक अग्रवाल आणि वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग यांचा कायम ठेवलेल्या खेळाडूंमध्ये समावेश आहे. सलग चार मोसमात पंजाबसाठी 500 हून अधिक धावा करणाऱ्या राहुलला संघाने कायम न ठेवण्याचा निर्णय घेतला होता. संघाचे प्रशिक्षक अनिल कुंबळे म्हणाले होते की, मला राहुलला सोबत ठेवायचे होते, मात्र त्यांनी संघ सोडण्याचा निर्णय घेतला होता.
राहुलने पंजाब का सोडला?
राहुलने रेड बुल क्रिकेटशी केलेल्या संभाषणात सांगितले की, हा त्याच्यासाठी खूप कठीण निर्णय होता, पण आता त्याच्या नशिबात काय आहे ते पाहायचे आहे. तो म्हणाला, “मी चार वर्षापर्यंत त्यांच्यासोबत होतो. यादरम्यान माझा खूप चांगला काळ होता. मला फक्त माझ्या नशिबात काय आहे ते पहायचे होते. हा निश्चितच खूप कठीण निर्णय होता. मी बराच काळ पंजाबशी संबंधित होतो. मी काही वेगळे करू शकतो का ते पहायचे होते.”
Kharediwala फॉर एव्हरीवन..! होय, आता आम्ही घेऊन आलोय आलेय इंडियन ईकॉमर्स..!
आता राहुल लखनौकडून खेळणार
लखनौने लोकेश राहुलला ड्राफ्ट पिकमध्ये सामील करून संघाचा कर्णधारही बनवला. लखनौचा पहिला सामना गुजरातच्या संघाशी आहे. हा संघ प्रथमच आयपीएलमध्ये सहभागी झाला आहे. लखनौ ही आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडी फ्रँचायझी आहे. उत्तर प्रदेशातील हा पहिला संघ आहे. राहुलशिवाय रवी बिश्नोई आणि मार्कस स्टॉइनिस हे या संघाचे प्रमुख खेळाडू आहेत.