Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

IPL 2022: IPL वर पुन्हा संकट; राज्य सरकार घेऊ शकते ‘हा’ मोठा निर्णय

दिल्ली – आयपीएलचा 15वा सीझन (IPL 2022) सुरू होण्यापूर्वी चाहत्यांसाठी मोठी बातमी समोर येत आहे. टूर्नामेंटचे सामने प्रेक्षकांशिवाय बंद दाराआड खेळवले जाऊ शकतात. यापूर्वी 25% चाहत्यांच्या परवानगीने ही स्पर्धा सुरू करण्याची चर्चा होती, मात्र महाराष्ट्र सरकार (Maharashtra government) येत्या काही दिवसांत ही परवानगी मागे घेऊ शकते.

Advertisement

वास्तविक, केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारला राज्यात कोविड-19 च्या नव्या धोक्याबद्दल इशारा दिला आहे, ज्याचा परिणाम आयपीएलवरही होऊ शकतो. महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh tope) यांनी एएनआयला सांगितले की केंद्र सरकारकडून आम्हाला सतर्क राहण्याचे पत्र मिळाले आहे. युरोपीय देश, दक्षिण कोरिया आणि चीनमध्ये कोविड-19 चे रुग्ण वाढले आहेत. हे लक्षात घेऊन आरोग्य विभागाने सतर्क राहून आवश्यक ती पावले उचलण्याचे पत्र दिले होते. मात्र, आम्ही सध्या आयपीएल सामन्यावर टिप्पणी करू इच्छित नाही.

Advertisement

लीगचे सर्व 70 सामने महाराष्ट्रातील मुंबई (वानखेडे, ब्रेबॉन आणि डीवाय पाटील स्टेडियम) आणि पुणे (एमसीए स्टेडियम) या दोन शहरात खेळवले जातील. IPL 2022 चा पहिला सामना 26 मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे.

Advertisement

Kharediwala फॉर एव्हरीवन..! होय, आता आम्ही घेऊन आलोय आलेय इंडियन ईकॉमर्स..!

Loading...
Advertisement

अॅनरिक नॉर्टजे मुंबईत दाखल
दिल्ली कॅपिटल्ससाठी चांगली बातमी समोर येत आहे. संघाचा वेगवान गोलंदाज अॅनरिक नॉर्टजे आगामी हंगामासाठी मुंबईत पोहोचला आहे. अॅनरिक नॉर्टजेच्या या स्पर्धेत खेळण्यावर काही काळ सस्पेंस होता, पण मुंबईत पोहोचल्यावर त्याने फ्रँचायझींनाच नाही तर दिल्लीच्या चाहत्यांनाही मोठा दिलासा दिला.

Advertisement

या अनुभवी वेगवान गोलंदाजाने इंस्टाग्रामवर एक स्टोरी अपलोड करून मुंबईत आल्याची माहिती दिली आहे. तो आपल्या पत्नीसह येथे आला आहे.
अॅनरिक नॉर्टजेचे मुंबईत आगमन ही दिल्ली कॅपिटल्ससाठी खरोखरच दिलासा देणारी बातमी आहे, परंतु संघाची नजर आता सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि अष्टपैलू मिचेल मार्श यांच्यावर असेल. हे दोन्ही खेळाडू ऑस्ट्रेलियन संघासोबत पाकिस्तान दौऱ्यावर आहेत आणि त्यानंतरच ते आयपीएल-15 साठी भारतात पोहोचतील.

Advertisement

दिल्ली कॅपिटल्स 27 मार्च रोजी मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्याने स्पर्धेतील त्यांच्या मोहिमेची सुरुवात करेल. हा सामना ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply