दिल्ली – आयपीएल 2022 (IPL 2022) सुरू होण्यासाठी एका आठवड्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक असताना, सर्व संघ त्यांच्या प्लेइंग इलेव्हनला अंतिम करण्यात व्यस्त आहेत. अनेक संघांना आपले मोठे खेळाडू सुरुवातीच्या सामन्यात न खेळल्याने चिंतेत आहेत. यावेळी दिल्ली कॅपिटल्सची (Delhi Capitals) वेगवान गोलंदाजी हलकी दिसत होती कारण हा संघ पुन्हा कागिसो रबाडाला(Kagiso Rabada) कायम ठेवू शकला नाही किंवा विकत घेऊ शकला नाही आणि याशिवाय सातत्यपूर्ण गोलंदाज अॅनरिक नॉर्टजे (Anrich Nortje) बद्दल देखील अजूनही संभ्रम आहे.
आयपीएलचा 15वा सीझन खूपच रोमांचक असणार आहे. दरम्यान, ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्ससाठी आनंदाची बातमी आहे की त्यांचा वेगवान गोलंदाज अॅनरिक नॉर्टजे मुंबईत पोहोचला आहे. एनरिक मुंबईत आल्याने दिल्ली कॅपिटल्सने सुटकेचा नि:श्वास सोडला असेल, पण तरीही संघाची नजर पाकिस्तान दौऱ्यावर असलेल्या डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्शवर असेल. ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील पहिल्या पांढऱ्या चेंडूच्या सामन्यानंतरच हे दोन्ही खेळाडू आयपीएलमध्ये त्यांच्या नवीन संघात सामील होतील. दिल्ली कॅपिटल्सला 27 मार्चला मुंबई इंडियन्सविरुद्ध पहिला सामना खेळायचा आहे.
Kharediwala फॉर एव्हरीवन..! होय, आता आम्ही घेऊन आलोय आलेय इंडियन ईकॉमर्स..!
दिल्लीच्या संघाबद्दल बोलायचे झाले तर यावेळी संघ काहीसा असाच दिसत आहे. ऋषभ पंत (कर्णधार), अक्षर पटेल, पृथ्वी शॉ, एनरिक नॉर्टजे, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, शार्दुल ठाकूर, मुस्तफिजुर रहमान, कुलदीप यादव, अश्विन हेब्बर, अभिषेक शर्मा, कमलेश नागरकोटी, केएस भरत, मनदीप सिंग, खलील अहमद, चेतन साकर , ललित यादव, रिपल पटेल, यश धुल, रोवमन पॉवेल, प्रवीण दुबे, लुंगी एनगिडी, विकी ओस्तवाल, सरफराज खान.