मुंबई – इंडियन प्रीमियर लीगमधील (IPL) सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच मोठा धक्का बसला आहे. या वेळी संघ आपला पहिला सामना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध (Delhi capitals) खेळणार आहे, परंतु मुंबईचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव (suryakumar Yadav) या सामन्यात खेळेल अशी अपेक्षा नाही. IPL 2022 पूर्वी मुंबईने यादवला मोठ्या रकमेसह कायम ठेवले होते. मात्र, तो सध्या दुखापतग्रस्त असून अशा स्थितीत त्याला पहिल्या सामन्यात खेळणे कठीण आहे.
विशेष म्हणजे, सूर्यकुमार यादव हा मुंबई इंडियन्सचा महत्त्वाचा सदस्य आहे आणि त्याने एकट्याने संघासाठी अनेक सामने जिंकले आहेत. अलीकडच्या काळात त्याने राष्ट्रीय संघासाठीही चमकदार कामगिरी केली आहे. अशा परिस्थितीत त्याच्या अनुपस्थितीमुळे संघाला काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
Kharediwala फॉर एव्हरीवन..! होय, आता आम्ही घेऊन आलोय आलेय इंडियन ईकॉमर्स..!
वृत्तांवर विश्वास ठेवला तर, मुंबई इंडियन्सचा आघाडीचा फलंदाज सूर्यकुमार यादव 27 मार्च रोजी होणाऱ्या संघाच्या पहिल्या सामन्यासाठी उपलब्ध असणार नाही. वृत्तसंस्था पीटीआयच्या वृत्तानुसार, सूर्यकुमार यादव आयपीएलच्या मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामन्यासाठी उपलब्ध होणार नाही कारण त्याच्या अंगठ्याला हेअरलाइन फ्रॅक्चर आहे, ज्याचा त्रास त्याला वेस्ट इंडिजविरुद्धच्या T20 मालिकेदरम्यान झाला होता. सूर्यकुमार यादवला या दुखापतीतून सावरण्यासाठी वेळ लागेल.
मात्र, 2 एप्रिल रोजी होणाऱ्या राजस्थान रॉयल्सविरुद्ध मुंबई इंडियन्सच्या दुसऱ्या सामन्यासाठी सूर्यकुमार यादव उपलब्ध असेल, असे मानले जात आहे.