Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

40 वर्षानंतर पंतने मोडला कपिल देवचा ‘तो’ मोठा विक्रम; जाणुन घ्या ‘त्या’ बद्दल

मुंबई – टीम इंडियाचा (Team India) यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतने (Rishabh pant) बंगळुरू कसोटीत भारताच्या दुसऱ्या डावात कपिल देवचा (Kapil Dev) 40 वर्ष जुना विक्रम मोडला आहे. अवघ्या 28 चेंडूत 50 धावांचा टप्पा पार करून, पंत कसोटी क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वात जलद अर्धशतक झळकावणारा फलंदाज बनला आहे. यापूर्वी हा विक्रम कपिलच्या नावावर होता. कपिलने 1982 मध्ये पाकिस्तानविरुद्ध कराचीमध्ये 30 चेंडूत अर्धशतक ठोकले होते.

Advertisement

सर्वात वेगवान अर्धशतक झळकावणाऱ्यांमध्ये सातव्या क्रमांकावर
सर्वात जलद अर्धशतक झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पंत सातव्या क्रमांकावर आहे. तो या स्थानावर इतर 4 फलंदाजांसह उपस्थित आहे. त्याच्या आधी अल्बर्ट विल्यम्स, सर इयान बॉथम, ख्रिस गेल, कॉलिन डी ग्रँडहोम यांनी 28 चेंडूत अर्धशतके झळकावली आहेत. त्याचबरोबर 3 फलंदाजांनी 26 चेंडूत अर्धशतकं ठोकली आहेत. पाकिस्तानचा माजी कर्णधार मिसबाह-उल-हक हा सर्वात जलद अर्धशतक करणारा फलंदाज आहे. त्याने 21 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. डेव्हिड वॉर्नर 23 चेंडूत 50 धावा करून दुसऱ्या तर जॅक कॅलिस 24 चेंडूत 50 धावा करून तिसऱ्या स्थानावर आहे.

Loading...
Advertisement

Kharediwala फॉर एव्हरीवन..! होय, आता आम्ही घेऊन आलोय आलेय इंडियन ईकॉमर्स..!

Advertisement

कसोटीत सर्वात जलद अर्धशतक करणारा विकेटकीपर फलंदाज पहिला ठरला
पंत हा पहिला सर्वात जलद अर्धशतक करणारा यष्टीरक्षक फलंदाज बनला आहे. न्यूझीलंडच्या इयान स्मिथने 1990 मध्ये पाकिस्तानविरुद्ध 34 चेंडूत अर्धशतक केले होते आणि भारताच्या महेंद्रसिंग धोनीने 2006 मध्ये पाकिस्तानविरुद्ध 34 चेंडूत अर्धशतक केले होते.

Advertisement
Advertisement

Leave a Reply