Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

शानदार: हरमनप्रीत कौर आणि स्मृती मानधनाने मोडला; ‘तो’ नऊ वर्ष जुना विक्रम

मुंबई – महिला विश्वचषक स्पर्धेतील (Woman’s World Cup) तिसऱ्या सामन्यात भारताने (India) वेस्ट इंडिजचा (West Indies) 155 धावांनी पराभव केला. या विजयासह टीम इंडिया वर्ल्ड कप पॉइंट टेबलमध्ये पहिल्या स्थानावर आली आहे. भारताकडून स्मृती मंधाना (Smriti mandhana) आणि हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) यांनी शतके झळकावली आणि संघाची धावसंख्या 300 च्या पुढे नेली. मंधाना आणि कौर यांनी या सामन्यात चौथ्या विकेटसाठी 184 धावांची विक्रमी भागीदारी केली. महिला विश्वचषकातील भारतासाठी ही सर्वात मोठी भागीदारी आहे. या दोघांनी नऊ वर्षे जुना विक्रम मोडला आहे. यापूर्वी 2013 मध्ये कामिनी आणि पूनम राऊत यांनी 175 धावांची भागीदारी केली होती.

Advertisement

या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यास्तिका भाटिया आणि स्मृती मानधना यांनी पहिल्या विकेटसाठी झटपट 49 धावा करून शानदार सुरुवात केली. यानंतर भारताने 29 धावा करताना तीन महत्त्वाचे विकेट गमावले. संघ अडचणीत आला होता. यानंतर हरमनप्रीतने मंधानाला साथ दिली आणि आपल्या संघाला चांगल्या स्थितीत आणले.

Advertisement

Kharediwala फॉर एव्हरीवन..! होय, आता आम्ही घेऊन आलोय आलेय इंडियन ईकॉमर्स..!

Loading...
Advertisement

या सामन्यात हरमनप्रीत फलंदाजीला आली तेव्हा भारताची धावसंख्या तीन गड्यांच्या मोबदल्यात 78 धावा होती. त्याचवेळी ती आऊट होऊन पॅव्हेलियनमध्ये परतली तेव्हा टीमने सात गडी गमावून 313 धावा केल्या होत्या. गेल्या सामन्यातही हरमनप्रीत कौरने सुरेख अर्धशतक झळकावले होते, पण तिला संघाला विजय मिळवून देता आला नाही. या सामन्यात मंधानाने सुरुवातीपासूनच एक टोक राखले आणि 300 हून अधिक धावा करून भारताचा विजय जवळपास निश्चित केला.

Advertisement

महिला विश्वचषकात चौथ्यांदा दीडशेहून अधिक धावांची भागीदारी
महिला विश्वचषकात भारतीय जोडीने 150 हून अधिक धावांची भागीदारी करण्याची ही चौथी वेळ होती. मंधाना आणि कौर यांच्या आधी कामिनी आणि पूनम राऊत यांनी 2013 मध्ये 175 धावा जोडल्या होत्या. 2017 च्या विश्वचषकात मिताली राज आणि पूनम राइट यांनी 157 धावांची भागीदारी केली होती. 2000 मध्ये अंजुम चोप्रा आणि चंद्रकांता कौल यांनी 151 धावांची भागीदारी केली होती. मंधानाने 2017 मध्येही शानदार फलंदाजी केली आणि पूनम राऊतसोबत 144 धावांची भागीदारी केली.

Advertisement
Advertisement

Leave a Reply