Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

भारत देणार वेस्ट इंडिजला धक्का; जाणून घ्या कुठे आणि कसा पाहता येणार सामना

मुंबई – महिला विश्वचषक 2022 (ICC Woman’s Cricket World Cup) मध्ये भारतीय संघाचा तिसरा सामना वेस्ट इंडिज (West Indies) विरुद्ध आहे. या स्पर्धेत सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकलेल्या वेस्ट इंडिजला तिसरा सामना जिंकून भारताविरुद्धचा विक्रम सुधारायचा आहे. त्याचबरोबर न्यूझीलंडविरुद्ध पराभूत झाल्यानंतर टीम इंडियाला विजयी मार्गावर परतायचे आहे. सेमीफायनलच्या शर्यतीत टिकण्यासाठी भारताला हा सामना जिंकावाच लागेल. भारताचा वेस्ट इंडिजविरुद्धचा विक्रमही उत्कृष्ट आहे.

Advertisement

महिला विश्वचषक स्पर्धेत वेस्ट इंडिजविरुद्धचे सर्व सहा सामने भारताने जिंकले आहेत. दोन्ही संघांमध्ये एकूण 25 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत आणि भारताने 20 सामने जिंकले आहेत. हा सामना जिंकून टीम इंडियाला विश्वचषकात विंडीजविरुद्ध अजिंक्य राहण्याचा विक्रम कायम ठेवायचा आहे. येथे आम्ही सांगत आहोत की तुम्ही हा सामना कधी आणि कुठे पाहू शकता.

Advertisement

Kharediwala फॉर एव्हरीवन..! होय, आता आम्ही घेऊन आलोय आलेय इंडियन ईकॉमर्स..!

Advertisement

भारत आणि वेस्ट इंडिज महिला संघांमधला एकदिवसीय विश्वचषक सामना कधी खेळला जाईल?
भारत आणि वेस्ट इंडिज महिला संघांमधला एकदिवसीय सामना 12 मार्चला म्हणजेच शनिवारी होणार आहे.

Advertisement

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील सामना कुठे होणार?
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील विश्वचषक सामना सेडॉन पार्क, हॅमिल्टन येथे होणार आहे.

Loading...
Advertisement

सामना किती वाजता खेळला जाईल?
या सामन्यात भारतीय वेळेनुसार सकाळी 6 वाजता नाणेफेक होणार असून पहिला चेंडू संध्याकाळी 6.30 वाजता टाकला जाणार आहे.

Advertisement

कोणत्या टीव्ही चॅनेलवर सामने प्रसारित केले जातील?
महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचे प्रसारण हक्क स्टार नेटवर्ककडे आहेत. त्यामुळे भारत विरुद्ध वेस्ट इंडिज सामना देखील स्टार स्पोर्ट्स वाहिनीवर प्रसारित केला जाईल. स्टार स्पोर्ट्स चॅनलवर तुम्ही वेगवेगळ्या भाषांमध्ये थेट सामने पाहू शकता.

Advertisement

मी लाइव्ह स्ट्रीमिंग ऑनलाइन कुठे पाहू शकतो?
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील विश्वचषक सामन्याचे थेट प्रसारण भारतातील हॉटस्टार अॅपवर पाहता येईल.

Advertisement

भारताचा संभाव्य संघ
मिताली राज (कर्णधार), स्मृती मानधना, यास्तिका भाटिया, दीप्ती शर्मा, हरमनप्रीत कौर, रिचा घोष (wk), स्नेह राणा, पूजा वस्त्राकार, झुलन गोस्वामी, मेघना सिंग, राजेश्वरी गायकवाड.

Advertisement

वेस्ट इंडिजचा संभाव्य संघ
स्टॅफनी टेलर (कर्णधार), डिआंड्रा डॉटिन, हेली मॅथ्यूज, किशिया नाइट, शेमेन कॅम्पबेल (wk), चाडियन नेशन, चिनेल हेन्री, आलिया अॅलन, शमिलिया कोनेल, अनीसा मोहम्मद, शकीरा सेलमन.

Advertisement
Advertisement

Leave a Reply