मुंबई – श्रीलंकेचा (Sri lanka) महान वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाने (Lasith Malinga) आयपीएलमध्ये (IPL) पुनरागमन केले आहे. राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) त्याची वेगवान गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. मलिंगा आयपीएलच्या 10 हंगामात खेळला आहे. लीगमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे.
राजस्थान रॉयल्सने शुक्रवारी याची घोषणा केली. मलिंगा लीगच्या सुरुवातीपासूनच मुंबई इंडियन्स संघाशी एक खेळाडू म्हणून जोडला गेला होता. मात्र, आता आंतरराष्ट्रीय आणि लीग क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्याने मुंबईला मागे टाकत राजस्थान संघात प्रशिक्षक म्हणून सामील होण्याचा निर्णय घेतला आहे.
Kharediwala फॉर एव्हरीवन..! होय, आता आम्ही घेऊन आलोय आलेय इंडियन ईकॉमर्स..!
मलिंगा संगकारासोबत सामील होणार
मलिंगा त्याचा जुना सहकारी कुमार संगकाराला संघात सामील करेल. संगकारा क्रिकेटचा संचालक आणि राजस्थान रॉयल्सचा प्रशिक्षकही आहे. मलिंगाने निवृत्तीनंतर श्रीलंकेच्या राष्ट्रीय संघातही काम केले आहे. त्यानंतर त्यांना सल्लागार पद देण्यात आले. नुकतेच मलिंगाने ऑस्ट्रेलियन दौऱ्यावर श्रीलंकन संघासोबतही केले होते.
मलिंगा आयपीएलमध्ये सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज
मलिंगा 2008 मध्ये मुंबई संघात सामील झाला होता. मात्र, त्यावेळी तो दुखापतग्रस्त झाला आणि संपूर्ण हंगामात तो खेळला नाही. यानंतर 2009 मध्ये मुंबईने खरेदी केली आणि तेव्हापासून ते 2019 पर्यंत तो या संघाशी जोडला गेला. यादरम्यान मलिंगाने आयपीएलमधील 122 सामन्यांमध्ये 170 विकेट घेतल्या.
ब्राव्हो लसिथ मलिंगाचा विक्रम मोडू शकतो
मात्र, यंदा मलिंगाचा विक्रम मोडीत निघू शकतो. त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या चेन्नई सुपर किंग्जच्या ड्वेन ब्राव्होने 151 सामन्यांमध्ये 167 विकेट घेतल्या आहेत आणि या मोसमात तीन विकेट घेतल्यावर तो मलिंगाला मागे टाकेल.