Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

IPL 2022: दिल्ली कॅपिटल्सने दिला भारताच्या ‘या’ माजी खेळाडुला धक्का; आता..

मुंबई – दिल्ली कॅपिटल्सने (Delhi capitals) बिजू जॉर्ज (Biju George) यांची आयपीएल 2022 (IPL 2022) साठी क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. बिजू दिल्ली कॅपिटल्समध्ये मोहम्मद कैफची (Mohommad Kaif) जागा घेणार आहे. भारताचा माजी खेळाडू कैफ बराच काळ ही जबाबदारी पार पाडत होता. मात्र आता व्यवस्थापनाने क्षेत्ररक्षण प्रशिक्षकाची जबाबदारी बिजू यांच्यावर सोपवली आहे. बिजूसोबत दिल्लीच्या सपोर्ट स्टाफमध्ये रिकी पाँटिंग, शेन वॉटसन आणि जेम्स होप्स यांचाही समावेश आहे. नुकतेच अजित आगरकरही सामील झाले आहेत.

Advertisement

क्रिकबझमधील एका बातमीनुसार, दिल्ली कॅपिटल्सशी संबंधित सूत्रांनी पुष्टी केली आहे की बिजू जॉर्ज यांना संघाने क्षेत्ररक्षण प्रशिक्षकाची जबाबदारी दिली आहे. संघाचे म्हणणे आहे की बिजूला आयपीएल तसेच आंतरराष्ट्रीय संघांना प्रशिक्षण देण्याचा अनुभव आहे. त्यामुळे बिजू दिल्ली कॅपिटल्ससाठी उपयुक्त ठरेल.

Advertisement

Kharediwala फॉर एव्हरीवन..! होय, आता आम्ही घेऊन आलोय आलेय इंडियन ईकॉमर्स..!

Loading...
Advertisement

बिजू खूप दिवसांपासून कोचिंग देत आहे. त्यांनी भारतीय महिला क्रिकेट संघासोबतही काम केले आहे. त्याने आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सला फॉल्डिंगचे प्रशिक्षण दिले आहे. बिजूने 2015 आणि 2016 मध्ये कोलकातासोबत काम केले आहे. त्याने कुवेत राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षकपदही भूषवले आहे.

Advertisement

दिल्ली कॅपिटल्सने या हंगामात ऋषभ पंतकडे संघाचे कर्णधारपद सोपवले आहे. पंतच्या नेतृत्वाखाली टीम पंत 27 मार्च रोजी आयपीएल 2022 चा पहिला सामना मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळणार आहे. या सामन्यानंतर संघाचा दुसरा सामना गुजरात टायटन्सशी होणार आहे. दिल्ली कॅपिटल्स 21 मे रोजी मुंबई विरुद्ध आयपीएल 2022 चा शेवटचा लीग सामना खेळणार आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply