Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

IPL: अन्.. आता धोनी दिसला चक्क आजोबाच्या अवतारात; चाहत्यांना बसत नाही विश्वास

मुंबई – अलीकडेच, धोनी (M.S.Dhoni) चा नवा लूक खूप व्हायरल झाला ज्यामध्ये तो बस कंडक्टर झाला. धोनीच्या लूकची खूप चर्चा देखील झाली. तर आता माहीची वेगळी स्टाईल पाहून चाहते थक्क झाले आहेत. यावेळी धोनी ‘अंग्री आजोबा’च्या भूमिकेत दिसत आहे. धोनीची स्टाइल आणखीनच फनी आहे, जी पाहून तुम्हालाही हसू आवरत नाही. धोनीचा हा नवा लूक टाटा IPL (IPL 2022) च्या प्रचारासाठी बनवण्यात आला आहे.

Advertisement

धोनीचा हा नवा लूक व्हायरल होत आहे. यंदा 26 मार्चपासून आयपीएल सुरू होत आहे. त्यांच्या पहिल्या सामन्यात सीएसकेचा केकेआरशी सामना होणार आहे. BCCI ने IPL वेळापत्रक (IPL 2022 Schedule) जाहीर केले आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियम आणि क्रिकेट क्लब ऑफ इंडिया, नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियम आणि पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम या चार स्टेडियममध्ये खेळल्या जाणाऱ्या या चित्तथरारक लीगचे वेळापत्रक बीसीसीआयने रविवारी जाहीर केले.

Advertisement

Kharediwala फॉर एव्हरीवन..! होय, आता आम्ही घेऊन आलोय आलेय इंडियन ईकॉमर्स..!

Advertisement

बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी प्रसिद्धीमाध्यमांमध्ये सांगितले की, “65 दिवसांत एकूण 70 लीग सामने आणि चार प्लेऑफ सामने खेळवले जातील. स्पर्धेत 12 ‘डबल हेडर’ (दिवसात दोन सामने) असतील आणि दिवशी पहिला सामना दुपारी 3.30 वाजता सुरू होईल आणि संध्याकाळचा सामना 7.30 वाजता सुरू होईल. पहिला ‘डबल-हेडर’ 27 मार्च रोजी ब्रेबॉर्न स्टेडियमवर (CCI) दिवसाच्या सामन्यासह होईल ज्यामध्ये दिल्ली कॅपिटल्स पाच वेळा चॅम्पियन असलेल्या मुंबई इंडियन्सशी भिडतील. त्यानंतर संध्याकाळचा सामना डीवाय पाटील स्टेडियमवर होणार असून त्यात पंजाब किंग्जचा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूशी होणार आहे.

Loading...
Advertisement

29 मार्च रोजी पुण्यात पहिला सामना होणार असून यामध्ये सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने येणार आहेत. बीसीसीआयने आधीच वानखेडे आणि डीवाय पाटील स्टेडियमवर 20 सामने खेळवले जातील, तर 15-15 सामने ब्रेबॉर्न स्टेडियम आणि पुणे येथे खेळवले जातील अशी घोषणा केली होती.

Advertisement

Dhoni

Advertisement

अंतिम लीग सामना देखील येथे वानखेडे स्टेडियमवर खेळला जाईल ज्यामध्ये सनरायझर्स हैदराबादचा सामना 22 मे रोजी पंजाब किंग्जशी होईल. गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट्स या दोन नवीन संघांचा पहिला सामना 28 मार्च रोजी वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. बीसीसीआयने सांगितले की, प्लेऑफ आणि फायनलचे वेळापत्रक (29 मे रोजी होणार आहे) ठिकाण नंतर जाहीर केले जाईल.

Advertisement
Advertisement

Leave a Reply