मुंबई – मोहालीत खेळल्या जात असलेल्या भारत आणि श्रीलंका (IND vs Sri lanka) यांच्यातील पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी अशी घटना पाहायला मिळाली, जी पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) भारताचा पहिला डाव 574/8 या धावसंख्येवर घोषित केला. रोहितने डाव घोषित केला तेव्हा रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) नाबाद 175 धावांवर खेळत होता. मोहम्मद शमीसोबत (Mohammad shami) त्याने 9व्या विकेटसाठी 94 चेंडूत नाबाद 103 धावांचीही भागीदारी केली, जडेजाला ज्या प्रकारची लय होती, त्याला 20 ते 25 मिनिटे जास्त मिळाली असती तर तो द्विशतक करू शकला असता.
आता रोहितच्या या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. 18 वर्षांपूर्वी 2004 ची कसोटी सर्वांना आठवत आहे जेव्हा राहुल द्रविडने सचिन तेंडुलकरला 194 धावांवर माघारी बोलावले होते.
तेव्हा द्रविड कर्णधार होता आणि आता प्रशिक्षक
2004 मध्ये भारत पाकिस्तानच्या दौऱ्यावर होता. मुलतानमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत टीम इंडियाची कमान राहुल द्रविडकडे (Rahul Dravid) होती, जो सध्या भारतीय संघाचा प्रशिक्षक आहे. या सामन्यात वीरेंद्र सेहवागच्या त्रिशतकामुळे टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली.
Kharediwala फॉर एव्हरीवन..! होय, आता आम्ही घेऊन आलोय आलेय इंडियन ईकॉमर्स..!
सचिननेही अप्रतिम फलंदाजी करताना 194 धावांची नाबाद खेळी खेळली, मात्र द्रविडमुळे सचिन आपले द्विशतक पूर्ण करू शकला नाही आणि जेव्हा तो ड्रेसिंग रूमच्या दिशेने जात होता तेव्हा त्याला राहुल द्रविडच्या निर्णयाचे केवळ आश्चर्यच वाटले नाही तर राग देखील आले होते.
वास्तविक, भारताची धावसंख्या 161.4 षटकात चार विकेट गमावून 675 धावा होती. युवराज सिंग 59 धावा करून खेळत होता, मात्र फहरातच्या पुढच्याच चेंडूवर युवराज सिंग बाद झाला. युवराजची विकेट पडल्याबरोबर राहुल द्रविडने डाव घोषित केला आणि सचिन तेंडुलकरला त्याने दुस-या टोकाला खेळत 194 धावा देत द्विशतक पूर्ण करता आले नाही. जडेजाच्या आजच्या खेळीचा या घटनेशी संबंध जोडला जात आहे.सोशल मीडियावर लोक द्रविड आणि रोहितला ट्रोल करत आहेत.
सर जडेजाने फटकेबाजी केली
रवींद्र जडेजाने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत 228 चेंडूत नाबाद 175 धावांची खेळी केली. ही त्याची कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्तम कामगिरी ठरली. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच षटकार मारत 150 धावांचा टप्पा पूर्ण केला. जडेजाच्या कसोटी कारकिर्दीतील हे दुसरे शतक असून प्रथम श्रेणी क्रिकेटमधील त्याचे 11वे शतक आहे. यापूर्वी, सर जडेजाने 2018 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध नाबाद 100 धावा केल्या होत्या. 7व्या क्रमांकावर फलंदाजी करताना जडेजाने कसोटी क्रिकेटमधील दोन्ही शतके झळकावली.