Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

अखेर पाकिस्तानची प्रतिक्षा संपली; रावळपिंडीत आला ‘तो’ ऐतिहासिक क्षण

मुंबई – पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया (Pakistan vs Australia) यांच्यातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेला शुक्रवारपासून रावळपिंडीत (Rawalpindi)  सुरुवात झाली. पहिल्या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर, पाकिस्तानमध्ये क्रिकेटचे पुनरागमन झाले आहे, असे आपण म्हणू शकतो. जोस हेझलवूड आणि मिचेल स्टार्क यांनी ऑस्ट्रेलियाकडून डावाची सलामी दिली.

Advertisement

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने (Babar Azam) सामन्यापूर्वी नाणेफेक जिंकल्यानंतर खेळपट्टीचे कौतुक करताना म्हटले होते की, खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली आहे. त्यामुळे आम्ही प्रथम फलंदाजी करू इच्छितो. आम्ही तुम्हाला सांगतो की ऑस्ट्रेलियन संघ 24 वर्षांनंतर पाकिस्तानच्या भूमीवर क्रिकेट खेळण्यासाठी आला आहे. 3 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना रावळपिंडी येथे खेळला जात आहे, ज्यामध्ये पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने आहेत. यानंतर पुढील दोन सामने कराची आणि लाहोरमध्ये होणार आहेत. कसोटी मालिकेनंतर रावळपिंडीतील याच मैदानावर तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि शेवटी एक टी-20 सामनाही खेळवला जाईल.

Advertisement

https://bit.ly/3gKdz4F मराठमोळ्या खरेदीसाठी मराठमोळे पोर्टल..! होय आम्ही आलोय मराठी माणसांच्या आनंदासाठी..!

Loading...
Advertisement

पहिल्या सामन्यातील प्लेइंग इलेव्हनबद्दल बोलायचे झाले तर..
पाकिस्तान- अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हख, अझहर अली, बाबर आझम, फवाद आलम, मोहम्मद रिझवान, इफ्तिखार अहमद, नौमन आला, साजिद खान, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी.

Advertisement

ऑस्ट्रेलिया – डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, कॅमेरॉन ग्रीन, अॅलेक्स कॅरी, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, जोस हेझलवूड.

Advertisement
Advertisement

Leave a Reply