मुंबई – मोहालीच्या मैदानावर भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील पहिला कसोटी सामना विराट कोहलीसाठी (Virat Kohli) अधिक खास बनला आहे. 100 वा कसोटी सामना खेळताना विराट कोहलीनेही आपल्या कारकिर्दीतील 8000 धावा पूर्ण केल्या आहेत. अशी कामगिरी करणारा विराट सहावा भारतीय फलंदाज ठरला आहे. या सामन्यात प्रवेश करण्यापूर्वी त्याला केवळ 38 धावांची गरज होती.
मोहाली कसोटी सामन्यात विराट कोहली त्याच्या 100 व्या कसोटी सामन्यामुळे चर्चेत आहे. भारतासाठी 100 कसोटी सामने खेळणारा विराट कोहली हा 12वा खेळाडू ठरला आहे. सामना सुरू होण्यापूर्वी बीसीसीआयकडून विराटचा मैदानावरच सत्कारही करण्यात आला. प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी विशेष कॅप देऊन त्यांचा गौरव केला.
https://bit.ly/3gKdz4F मराठमोळ्या खरेदीसाठी मराठमोळे पोर्टल..! होय आम्ही आलोय मराठी माणसांच्या आनंदासाठी..!
विराट कोहलीने कसोटी कारकिर्दीत 8000 धावा पूर्ण केल्या आहेत. हा विक्रम गाठण्यासाठी विराट कोहलीने 169 डावात फलंदाजी केली. विराट अशी कामगिरी करणारा सहावा भारतीय फलंदाज ठरला असून सर्वात जलद 8000 धावा करणारा पाचवा भारतीय बनला आहे. यादरम्यान विराट कोहलीची सरासरी ५० च्या वर गेली आहे.
या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताला दोन्ही सलामीवीरांनी झटपट सुरुवात केली पण त्यांना केवळ 52 धावांची भर घालता आली. रोहित शर्माच्या रूपाने भारताला पहिला झटका बसला.