Take a fresh look at your lifestyle.

IPL 2022: महाराष्ट्र सरकार आणि BCCI ने घेतला मोठा निर्णय; आता 15 एप्रिल पर्यंत…

मुंबई – स्टेडियममध्ये जाऊन आयपीएलचा (IPL 2022) आनंद घेण्याचा विचार करणाऱ्या भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र सरकार (Maharashtra Government) आणि बीसीसीआयने (BCCI) एका महत्त्वपूर्ण बैठकीत 15 एप्रिलपर्यंत होणाऱ्या सामन्यांमध्ये 25 टक्के प्रेक्षकांना प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. 15 एप्रिलनंतर होणाऱ्या सामन्यांबाबत नंतर निर्णय घेतला जाईल. 26 मार्चपासून आयपीएल सुरू होत आहे. मुंबई आणि पुण्यातील चार स्टेडियममध्ये 70 लीग सामने होणार आहेत.

Advertisement

दीपक चहर सलामीच्या सामन्यातून बाहेर
दीपक चहर आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये खेळणार नाही. 26 मार्चपासून मुंबई आणि पुणे येथे आयपीएल लीगचे सामने खेळवले जाणार आहेत. दीपक चहरला आयपीएल मेगा लिलावात चेन्नई सुपर किंग्जने 14 कोटींना विकत घेतले. दीपक चहरला गेल्या महिन्यात वेस्ट इंडिजविरुद्धच्या T20 मालिकेत दुखापत झाली होती. तिसर्‍या टी20 मध्ये त्याच्या क्वाड्रिसिप स्नायूला दुखापत झाली होती. त्यामुळे श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेतूनही तो बाहेर पडला. दीपकचे बाहेर पडणे चेन्नईसाठी मोठा धक्का आहे, कारण दीपकने खालच्या क्रमाने फलंदाजीसोबतच गोलंदाजीमध्येही अप्रतिम कामगिरी केली आहे.

Advertisement

Kharediwala फॉर एव्हरीवन..! होय, आता आम्ही घेऊन आलोय आलेय इंडियन ईकॉमर्स..!

Advertisement

8 मार्चपर्यंत आयपीएलचे सर्व संघ मुंबईत पोहोचणार
आयपीएल 2022 साठी, सर्व 10 संघ 8 मार्चपर्यंत मुंबईत पोहोचतील आणि 14 किंवा 15 मार्चपासून सर्व प्रशिक्षण सुरू करतील. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने एएनआयशी बोलताना ही माहिती दिली. ते म्हणाले की सर्व 10 संघांचे खेळाडू आणि सपोर्ट स्टाफचे सदस्य 8 मार्चपर्यंत मुंबईत पोहोचू शकतात, जिथे त्यांना 3 ते 4 दिवस क्वारंटाईनमध्ये राहावे लागेल आणि त्यानंतर सर्वांच्या RT-PCR चाचण्या केल्या जातील.

Advertisement

मुंबईत पाच ठिकाणी संघ सराव करतील
बीसीसीआयने आयपीएल सरावासाठी मुंबईतील 5 ठिकाणे ओळखली आहेत. यामध्ये मुंबई क्रिकेट असोसिएशनचे वांद्रे-कुर्ला येथील क्रीडा संकुल, क्रिकेट क्लब ऑफ इंडियाचे ब्रेबॉर्न स्टेडियम, डीवाय पाटील स्टेडियम, नवी मुंबईतील रिलायन्स कॉर्पोरेटचे मैदान आणि ठाण्यातील एमसीए मैदान यांचा समावेश आहे. यावेळी लीगमध्ये 12 डबल हेडर होऊ शकतात. आयपीएलचे पूर्ण वेळापत्रक अद्याप अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेले नाही.

Advertisement
Advertisement

Leave a Reply