Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

BCCI ने दिला हार्दिक पांड्याला धक्का; हार्दिकला बसला 2 कोटीचा फटका

मुंबई – भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) 2021 टी-20 विश्वचषकापासून संघाबाहेर असलेला अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याला (Hardik Pandya) मोठा धक्का दिला आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, हार्दिक पांड्याच्या श्रेणींमध्ये बदल करण्यात आले आहे. त्यांची थेट श्रेणी-अ वरून श्रेणी-क मध्ये बदलण्यात आली आहे. हार्दिकऐवजी व्यंकटेश अय्यर सध्या टीम इंडियामध्ये अष्टपैलू खेळाडूची भूमिका बजावत आहे.

Advertisement

रिद्धिमान साहालाही धक्का
यष्टिरक्षक फलंदाज रिद्धिमान साहालाही याचा फटका बसला आहे. साहा यांना ग्रेड-बी वरून ग्रेड-सीमध्ये हलवण्यात आले आहे. साहा, पुजारा आणि रहाणे यांना श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी संघातून वगळण्यात आले होते. पुजारा आणि रहाणे गेल्या काही दिवसांपासून फॉर्मात नाहीत.

Advertisement

बोर्ड दरवर्षी जानेवारी ते एप्रिल दरम्यान वार्षिक केंद्रीय करार (BCCI सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट) जाहीर करते. यापूर्वीच्या करारात 28 खेळाडूंचा समावेश करण्यात आला होता. मात्र, यावेळी केवळ 27 खेळाडूंनाच करार देण्यात आला आहे.

Advertisement

Kharediwala फॉर एव्हरीवन..! होय, आता आम्ही घेऊन आलोय आलेय इंडियन ईकॉमर्स..!

Advertisement

किती रूपये मिळतात?
बीसीसीआय करार यादीतील खेळाडूंना चार प्रकारचे ग्रेड देते. यामध्ये A+, A, B आणि C चा समावेश आहे. प्रत्येक ग्रेडला ठराविक वार्षिक पगार असतो. A+ ग्रेडरना वार्षिक 7 कोटी रुपये, A ग्रेडरला 5 कोटी रुपये, बी ग्रेडरला 3 कोटी रुपये आणि C ग्रेडरला 1 कोटी रुपये मिळतात.

Loading...
Advertisement

रोहित, विराट आणि बुमराह यांना A+ ग्रेड
मागील यादीत ग्रेड-A+ मध्ये समाविष्ट असलेले तीन क्रिकेटपटू यावेळी देखील या यादीत आपले स्थान वाचविण्यात यशस्वी झाले. कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यांचा ग्रेड A+ मध्ये समावेश करण्यात आला आहे. त्याचवेळी, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, केएल राहुल, मोहम्मद शमी आणि ऋषभ पंत यांचा ग्रेड-ए मध्ये समावेश करण्यात आला आहे. गेल्या वर्षी अ श्रेणीत 10 खेळाडू होते, ते नव्या यादीत पाच झाले आहेत.

Advertisement

या खेळाडूंचे नुकसान
रहाणे-पुजारा यांना ग्रेड-अ मधून ब मध्ये पाठवण्यात आले.
हार्दिक पांड्याला ग्रेड-ए मधून ग्रेड-सी आणि साहाला ग्रेड-बी मधून ग्रेड-सी मध्ये पाठवण्यात आले.

Advertisement

वेगवान गोलंदाज इशांत शर्माला ग्रेड-ए मधून ग्रेड-बीमध्ये हलवण्यात आले आहे. यापूर्वी क गटात असलेले चायनामन गोलंदाज कुलदीप यादव आणि नवदीप सैनी यांना करारातून वगळण्यात आले आहे. सलामीवीर फलंदाज मयंक अग्रवालची गट-ब मधून गट-क मध्ये पदावनत करण्यात आली आहे.

Advertisement

या खेळाडूंना फायदा
मोहम्मद सिराज यांना गट-क मधून गट-ब मध्ये बढती देण्यात आली आहे.
याआधी करारात नसलेल्या सूर्यकुमार यादवचा ग्रेड-सीमध्ये समावेश करण्यात आला आहे.

Advertisement

कोण खेळाडू निवडतो?
बीसीसीआय कार्यालयाचे तीन अधिकारी, पाच निवडकर्ते आणि टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक खेळाडूंच्या ग्रेडवर निर्णय घेण्यासाठी उपस्थित आहेत.

Advertisement
Advertisement

Leave a Reply