Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

IND vs SL: किंग कोहली मोडणार का? सचिनचा ‘तो’ मोठा विक्रम; जाणुन घ्या ‘त्या’ बद्दल

मुंबई – भारत आणि श्रीलंका (IND vs Sri lanka) यांच्यातील कसोटी मालिका 4 मार्चपासून सुरू होत आहे. या सामन्यात भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीही (Virat Kohli) आपले 100 कसोटी सामने (100 Test Match) पूर्ण करेल. अशी कामगिरी करणारा तो 12वी भारतीय खेळाडू असेल. या सामन्यात विराट त्याच्या 8000 कसोटी धावाही पूर्ण करू शकतो. हा विक्रम करणारा कोहली हा सहावा भारतीय फलंदाज ठरणार आहे. कसोटीत 8000 धावा पूर्ण करण्यापासून तो फक्त 38 धावा दूर आहे. त्याच्या आधी सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सुनील गावस्कर, वीरेंद्र सेहवाग आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी हा पराक्रम केला आहे.

Advertisement

मोहाली कसोटीच्या पहिल्या डावात विराटने 38 धावा केल्या तर कसोटीत सर्वात जलद 8,000 धावा करणारा तो पाचवा भारतीय खेळाडू ठरेल. या स्थितीत तो 169 डावांत आठ हजार कसोटी धावा पूर्ण करेल.

Advertisement

सचिनने 154 डावात आठ हजार धावा पूर्ण केल्या होत्या

Advertisement

सचिन हा कसोटीत सर्वात वेगवान आठ धावा करणारा फलंदाज आहे. त्याने 154 डावात हा विक्रम केला. त्याच्यापाठोपाठ राहुल द्रविडने 158 डावात, वीरेंद्र सेहवागने 160 आणि सुनील गावस्करने 166 डावात स्थान मिळवले. मात्र, विराट गेल्या दोन वर्षांपासून धावांसाठी झगडत आहे. त्याचे बॅटने शेवटचे शतक नोव्हेंबर 2019 मध्ये बांगलादेशविरुद्ध झाले होते. विराटच्या कारकिर्दीतील ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा त्याला सलग दोन वर्षे शतक झळकावता आलेले नाही.

Loading...
Advertisement

Kharediwala घेऊन आलोय आलेय इंडियन ईकॉमर्स..!

Advertisement

विराटने 2021 मध्ये भारतात पाच कसोटी सामने खेळले. यामध्ये त्याने अवघ्या 26 च्या सरासरीने 208 धावा केल्या. त्याचा हा कोणत्याही वर्षातील सर्वात वाईट विक्रम आहे. तो आठ डावांत तीनवेळा शून्यावर बाद झाला. आठ पैकी सहा फिरकी गोलंदाजांनी त्याची विकेट घेतली. कोहली ऑफस्पिनरविरुद्ध तीनदा आणि डावखुरा फिरकीपटूविरुद्ध तीनदा बाद झाला. श्रीलंकेविरुद्धच्या T20 मालिकेतून विश्रांती घेतल्यानंतर विराट ताजेतवाने झाला असावा आणि आता त्याच्याकडून आणखी चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.

Advertisement

श्रीलंकेविरुद्ध मोठा विक्रम
विराट कोहलीचा श्रीलंकेविरुद्धचा रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. या संघाने शेवटचा भारत दौरा केला तेव्हा विराटने तीन सामन्यांत 610 धावा केल्या होत्या. या मालिकेत त्याने नागपुरात 213 आणि दिल्लीत 243 धावा केल्या. श्रीलंकेविरुद्धही त्याने सलग तीन शतके झळकावली आहेत. आपल्या जुन्या रेकॉर्डवरून प्रेरणा घेत विराट या मालिकेत शतकांचा दुष्काळ संपवू शकतो.

Advertisement
Advertisement

Leave a Reply