मुंबई – महिला क्रिकेट विश्वचषकापूर्वी (Woman’s Cricket World Cup) भारतीय महिला (Indian women’s team) संघासाठी दिलासादायक बातमी आहे. फलंदाज स्मृती मानधना (Smriti mandhana) हिला विश्वचषक खेळण्यासाठी तंदुरुस्त घोषित करण्यात आले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सराव सामन्याच्या सुरुवातीला शबनीम इस्माईलच्या बाऊन्सरचा फटका मंधानाला बसला होता. त्यावेळी तिला केवळ 12 धावा करता आल्या होत्या. डॉक्टरांनी मानधनाची तपासणी केली. वैद्यकीय कर्मचार्यांच्या मते, आघात (डोक्याला दुखापत) ची गरज भासली नाही. तिला फलंदाजी सुरू ठेवण्यासाठी तंदुरुस्त घोषित केले, परंतु सावधगिरी म्हणून ती मैदानाबाहेर गेली.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) अहवालानुसार, या घटनेनंतर 25 वर्षीय मानधनाची टीम डॉक्टरांनी तपासणी केली आणि सुरुवातीला तिला खेळ सुरू ठेवण्यासाठी तंदुरुस्त घोषित करण्यात आले. दीड षटकांनंतर ती निवृत्त झाली. त्यावेळच्या वैद्यकीय कर्मचार्यांच्या म्हणण्यानुसार, डाव्या हाताच्या फलंदाजाला दुखापत होण्याची चिन्हे दिसत नव्हती.
खरेदीचा आनंद आणि हमखास बचत म्हणजे आपला खरेदिवाला Kharediwala ..!
आघात म्हणजे काय?
एखाद्या खेळाडूच्या डोक्याला किंवा मानेला दुखापत असल्यास, हालचालींचे मूल्यांकन केले जाते. मैदानावरूनच मूल्यांकन सुरू होते आणि किती दुखापत आहे हे पाहिले जाते, खेळाडूला चक्कर येते का? डोकेदुखी आहे? चैतन्य आहे की नाही? पुढील मूल्यांकन आवश्यक असल्यास, खेळाडूची तपासणी केली जाते.
भारताला 1 मार्च रोजी दुसरा सराव सामना खेळायचा आहे
भारताला 1 मार्चला वेस्ट इंडिजविरुद्ध दुसरा सराव सामना खेळायचा आहे. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेसोबत खेळलेला पहिला सराव सामना टीम इंडियाने 2 धावांनी जिंकला होता. 245 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ 7 गडी गमावून 242 धावाच करू शकला. भारताकडून राजेश्वरी गायकवाडने 4 बळी घेतले. त्याचवेळी हरमनप्रीत कौरने 114 चेंडूत 103 धावांची खेळी केली.