मुंबई – IPL मध्ये जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) आतापर्यंत एकूण 130 विकेट घेतल्या आहेत. बुमराहने 2013 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून तो 106 सामने खेळला आहे. भारताचा वेगवान गोलंदाज बुमराहने त्याच्या आयपीएल कारकिर्दीबद्दल सांगितले आहे. अश्विनसोबत युट्यूब चॅनलवर (YouTube) बोलत असताना बुमराहने त्याचा पहिला आयपीएल अनुभव शेअर केला आहे.
अश्विनशी बोलताना बुमराहने हे देखील उघड केले आहे की शेवटी त्याला मुंबईसाठी खेळण्याची संधी कशी मिळाली. या वेगवान गोलंदाजाने सांगितले की, सुरुवातीला मला मुंबईतील शिबिरासाठी बोलावण्यात आले होते. मी मुंबई इंडियन्सच्या कॅम्पला गेलो होतो आणि मी पहिला गेम खेळणार नव्हतो कारण अक्षर पटेल आणि मी कॅम्पमध्ये उशीरा सहभागी झालो होतो. आम्ही सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये खेळत होतो, आम्हाला शिबिरात उशिरा बोलावण्यात आले.
मुंबई इंडियन्स (MI) चा संघ आधीच सराव करत होता. त्यादरम्यान मला गोलंदाजी करण्याचीही संधी मिळाली. त्या वेळी मी पांढऱ्या चेंडूनेही स्विंग करायचो. अशा परिस्थितीत मी नवीन चेंडूने गोलंदाजी केली, सराव दरम्यान मी पाँटिंगला 2 ते 3 वेळा आऊट केले. मी माझ्या गोलंदाजीने सर्वात मोठ्या फलंदाजांना त्रास दिला. त्यानंतर संघ व्यवस्थापनाने माझ्याबद्दल विचार केला आणि शेवटी मला आयपीएलमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली.
Kharediwala घेऊन आलोय आलेय इंडियन ईकॉमर्स..!
आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी केल्यानंतरही बुमराबची भारतीय संघात निवड झाली होती. बुमराहने 2016 मध्ये भारतासाठी पहिला सामना खेळला होता. 2016 मध्ये देखील बुमराहने आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये पदार्पण केले. मात्र, कसोटी पदार्पणासाठी त्याला थोडी प्रतीक्षा करावी लागली. अखेर 2018 मध्ये बुमराहला कारकिर्दीतील पहिला कसोटी सामना खेळण्याची संधी मिळाली.
जगातील सर्वोत्कृष्ट वेगवान गोलंदाजांपैकी एक असलेल्या जसप्रीत बुमराहने सांगितले की, रोहित शर्माने नेहमी त्याच्या क्षमतेवर विश्वास ठेवला आणि तो मुंबई इंडियन्ससाठी नवीन असतानाही भारतीय कर्णधाराने त्याला गोलंदाजीसाठी महत्त्वाची षटके दिली आणि आता तो त्याच्या पद्धती वापरत आहे.
बुमराहच्या मते, रोहितने त्याच्या गोलंदाजीच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावली. रोहितच्या नेतृत्वाखाली मी अधिक खेळू लागलो, त्याचा माझ्यावर खूप विश्वास होता. त्याने माझ्यात खूप आत्मविश्वास निर्माण केला.