मुंबई – अफगाणिस्तानचा (Afghanistan) फिरकी गोलंदाज राशिद खानने (Rashid Khan) बांगलादेशविरुद्धच्या (Bangladesh) तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात एक खास विक्रम केला आहे. राशिदने आपल्या एकदिवसीय कारकिर्दीत 150 बळी पूर्ण केले आहेत.अफगाणिस्तानच्या या फिरकीपटूचा हा 80 वा एकदिवसीय सामना आहे.
रशीदने आपल्या 80व्या एकदिवसीय सामन्यात 150 विकेट्स पूर्ण करून एक खास चमत्कार केला आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये 150 विकेट घेणारा रशीद जगातील तिसरा गोलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क आणि पाकिस्तानचा सकलेन मुश्ताक आहे. स्टार्कने आपल्या एकदिवसीय कारकिर्दीत 77 सामन्यांमध्ये 150 बळी पूर्ण केले होते, तर पाकिस्तानचा फिरकी गोलंदाज मुश्ताकने 78 एकदिवसीय सामन्यांमध्ये 150 बळी पूर्ण केले होते. एकदिवसीय क्रिकेटमध्ये 150 बळी पूर्ण करणारा रशीद हा दुसरा फिरकी गोलंदाज ठरला आहे.
अफगाणिस्तानच्या या फिरकीपटूने ट्रेंट बोल्टला मागे टाकले आहे. बोल्टने आपल्या एकदिवसीय कारकिर्दीत 81 सामन्यांत 150 बळी पूर्ण केले. ब्रेट लीने 82 सामन्यांत 150 विकेट्स घेण्यात यश मिळवले होते. या सगळ्याशिवाय भारताविषयी बोलायचे झाले तर अजित आगरकर हा भारताकडून वनडेमध्ये सर्वात वेगवान 150 विकेट घेणारा गोलंदाज आहे. आगरकरने एकदिवसीय सामन्यांमध्ये 97 सामन्यात 150 बळी पूर्ण केले. त्याचबरोबर झहीर खानला 150 वनडे विकेट्स पूर्ण करण्यासाठी 103 सामने लागले. भारताच्या फिरकीपटूबद्दल बोलायचे तर अनिल कुंबळेने 106 व्या सामन्यात वनडेमध्ये 150 विकेट पूर्ण केल्या.
Kharediwala घेऊन आलोय आलेय इंडियन ईकॉमर्स..!
या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी झालेल्या दोन्ही एकदिवसीय सामन्यांमध्ये बांगलादेशच्या संघाला सहज विजय मिळवता आला होता. बांगलादेशने पहिल्या एकदिवसीय सामन्यात 4 गडी राखून आणि दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 88 धावांनी विजय मिळवला.