Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

IND vs SL T-20 : भारताचा श्रीलंकेवर सहा गडी राखून विजय… मालिका ३-० ने जिंकली

धर्मशाला : भारताने (India) तिसऱ्या आणि शेवटच्या T-20 मध्ये श्रीलंकेचा (Sri lanka) सहा गडी राखून पराभव केला. धर्मशाला येथील एचपीसीए स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताने श्रीलंकेने दिलेले १४७ धावांचे लक्ष्य चार गडी गमावून १९ चेंडू राखून पार केले. मालिका ३-० ने जिंकली. भारताला विजय मिळवून देणाऱ्या श्रेयस अय्यरला सामनावीर आणि मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला. आता भारत आणि श्रीलंका संघ 4 मार्चपासून मोहाली (Mohali) येथे दोन कसोटी (Two Test) सामन्यांच्या मालिकेतील (Series) पहिला सामना खेळणार आहेत. विराट कोहलीच्या कारकिर्दीतील ही 100 वी कसोटीही असेल.

Advertisement

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने 20 षटकांत 5 गडी गमावून 146 धावा केल्या. श्रीलंकेच्या आघाडीच्या चार फलंदाजांना दुहेरी आकडाही स्पर्श करता आला नाही. यामध्ये पथुम निशांका (1 धाव), गुणतिलाका (0), चारिथ अस्लंका (4 धावा) आणि जेनिथ लियानेज (9 धावा) यांचा समावेश आहे. यानंतर यष्टिरक्षक फलंदाज दिनेश चंडिमल आणि कर्णधार दासून शनाका यांनी पाचव्या विकेटसाठी 31 धावांची भागीदारी रचली.

Advertisement

चंडिमल 22 धावा करून बाद झाला. त्याचवेळी, शेवटी कर्णधार शनाकाने तुफानी खेळी केली. तो 38 चेंडूत 74 धावा करून नाबाद राहिला. त्याने आपल्या खेळीत नऊ चौकार आणि दोन षटकार मारले. याशिवाय चमिका करुणारत्नेने 12 धावांची नाबाद खेळी खेळली. भारताकडून आवेश खानने दोन बळी घेतले. त्याचवेळी मोहम्मद सिराज, हर्षल पटेल आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

Loading...
Advertisement

147 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. कर्णधार रोहित शर्मा पाच धावा करून बाद झाला. यानंतर संजू सॅमसन आणि श्रेयस अय्यर यांनी दुसऱ्या विकेटसाठी 45 धावांची भागीदारी केली. सॅमसन 12 चेंडूत 18 धावा करून बाद झाला. त्यानंतर श्रेयसने दीपक हुडासोबत तिसऱ्या विकेटसाठी 48 धावांची भागीदारी केली. हुड्डा 16 चेंडूत 21 धावा करून बाद झाला. व्यंकटेश अय्यर चार चेंडूत पाच धावा काढून बाद झाला. दरम्यान, श्रेयसने टी20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील सहावे अर्धशतक झळकावले. या मालिकेतील त्याचे हे सलग तिसरे अर्धशतक ठरले. श्रेयसने रवींद्र जडेजाच्या साथीने भारताला १६.४ षटकांत सहा गडी राखून विजय मिळवून दिला.

Advertisement

श्रेयसने चौकार मारून सामना संपवला. तो 45 चेंडूत 73 धावा करून नाबाद राहिला. त्यात नऊ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. त्याचवेळी जडेजा 15 चेंडूत 22 धावा करून नाबाद राहिला.श्रीलंकेकडून लाहिरू कुमाराने दोन विकेट घेतल्या. याशिवाय दुष्मंथा चमीरा आणि चमिका करुणारत्ने यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

Advertisement
Advertisement

Leave a Reply