Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

IND vs SL: चहलच्या निशाण्यावर अनेक मोठे विक्रम; T20 मध्ये इतिहास रचण्याची संधी

मुंबई – लेगस्पिनर युझवेंद्र चहल (yuzvendra Chahal) हा सध्या भारतीय खेळाडूंकडून सर्वाधिक T20 आंतरराष्ट्रीय (T20 cricket) विकेट घेणारा गोलंदाज आहे. 31 वर्षीय चहलने मागील सामन्यात जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) मागे टाकत 67वी विकेट घेतली. या फॉरमॅटमध्ये त्याने आतापर्यंत 53 सामन्यांत 67 विकेट्स घेतल्या असून आणखी एक टप्पा गाठण्याच्या मार्गावर आहे.

Advertisement

चहलने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात विकेट घेतली होती आणि आता तो आणखी एक टप्पा गाठण्याच्या अगदी जवळ आहे. चहलने चार विकेट घेतल्यास टी-28 क्रिकेटमध्ये 250 बळी घेणारा तो चौथा भारतीय क्रिकेटपटू ठरेल.

Advertisement

आपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना..? मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा

Loading...
Advertisement

भारतासाठी सर्वाधिक टी-20 विकेट्स घेण्याच्या बाबतीत, फिरकीपटूंचे वर्चस्व आहे. यामध्ये पियुष चावला 270 विकेट्स घेऊन अव्वल स्थानावर आहे, तर रविचंद्रन अश्विन (264) आणि अमित मिश्रा (262) अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत.

Advertisement

श्रीलंकेविरुद्धच्या उर्वरित दोन सामन्यांमध्ये चहलच्या निशाण्यावर आणखी एक मोठा विक्रम असेल. त्याने सहा विकेट घेतल्यास, तो श्रीलंकेविरुद्धच्या T20 मध्ये सर्वाधिक विकेट घेण्याच्या बाबतीत ऑस्ट्रेलियन फिरकीपटू अॅडम झाम्पाला मागे टाकेल.

Advertisement

पहिला सामना 62 धावांनी जिंकून भारतीय संघ तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply