अर्र.. विराटच्या 100व्या कसोटीपूर्वीच BCCI ने दिला विराटला धक्का; आता…
मुंबई – भारत आणि श्रीलंका (India vs Sri lanka) यांच्यातील पहिला कसोटी सामना मोहाली येथे होणार आहे. टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीचा (Virat Kohli) हा 100 वा कसोटी सामना असेल, पण या कसोटीत प्रेक्षकांना प्रवेश मिळणार नाही. पंजाब क्रिकेट असोसिएशनचे सीईओ दीपक शर्मा (Deepak Sharma) म्हणाले, भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिली कसोटी कोणत्याही प्रेक्षकांशिवाय होणार आहे. कोरोनामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना मोहाली येथे खेळवला जाईल आणि दुसरा कसोटी सामना बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाईल. विराट कोहली हा सामना रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. कोहलीने आतापर्यंत 99 कसोटी सामन्यांमध्ये 50.39 च्या सरासरीने 7 हजार 962 धावा केल्या आहेत ज्यात त्याच्या नावावर 27 शतके आहेत. गेल्या दोन वर्षांपासून कोहलीला एकही शतक झळकावता आलेले नाही. अशा स्थितीत तो श्रीलंकेविरुद्धच्या 100व्या कसोटीत शतक झळकावेल अशी अपेक्षा आहे.
खरेदिवाला म्हणजे ऑफरवाला. https://bit.ly/3gpEvq9 यावर क्लिक करून करा खरेदी दणक्यात..!
टी-20 मालिकेतून विश्रांती
विराट कोहलीला श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. याआधी, वेस्ट इंडिज मालिकेतील दुसऱ्या टी-20मध्येही या खेळाडूने शानदार अर्धशतक झळकावले होते. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पराभवानंतर कोहलीने कसोटी कर्णधारपद सोडले. कोहलीने कर्णधारपद सोडल्यानंतर रोहित शर्माला तिन्ही फॉरमॅटचे कर्णधार बनवण्यात आले आहे.
विराट आयपीएलमध्येही कर्णधार होणार नाही
विराटने भारतीय संघाचे तसेच आरसीबीचे कर्णधारपद सोडले आहे. कोहलीने याआधी सांगितले होते की, टी-20 विश्वचषक ही सर्वात लहान फॉरमॅटमध्ये भारताचा कर्णधार म्हणून त्याची शेवटची स्पर्धा असेल. यानंतर त्याने आयपीएलचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली. यानंतर त्याला एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरून हटवण्यात आले आणि त्यानंतर त्याने कसोटी संघाचे कर्णधारपदही सोडले.