Take a fresh look at your lifestyle.

अन्.. ‘त्या’ दौऱ्यापूर्वी डेविड वॉर्नर झाला इमोशनल; Family साठी लिहला ‘हा’ विशेष पत्र

मुंबई – ऑस्ट्रेलियन संघ (Australia cricket team) तब्बल 24 वर्षांनंतर पाकिस्तानच्या दौऱ्यावर (Pakistan) गेला आहे. ऑस्ट्रेलियाने शेवटचा पाकिस्तान दौरा 1998 मध्ये केला होता, जिथे ऑस्ट्रेलियाने कसोटी मालिका 1-0 ने जिंकली होती. आता 24 वर्षांनंतर पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाचा संघ पाकिस्तानच्या भूमीवर कसोटी मालिका खेळणार आहे. पाकिस्तान दौऱ्यावर जाण्यापूर्वी संघाचा अनुभवी खेळाडू डेव्हिड वॉर्नर (Devid Warner) भावूक झाला आहे.

Advertisement

वास्तविक, वॉर्नरने सोशल मीडियावर (Social media) एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये त्याने आपल्या कुटुंबाचा फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करताना वॉर्नरने लिहिले की, ‘माझ्या मुलींना निरोप देणे नेहमीच कठीण असते, गेल्या काही महिन्यांत आम्ही खूप मजा केली, पण आता कामावर परतलो, मला तुम्हा सर्वांची खूप आठवण येईल,’ असे वॉर्नरनेही म्हटले आहे. त्याने पत्नी कँडिस वॉर्नरला टॅग केले आहे. वॉर्नरच्या या भावनिक पोस्टवर पत्नीनेही प्रतिक्रिया दिली असून एक सुंदर कमेंट केली आहे. कॅंडिसने लिहिले, ‘आम्ही तुला पुन्हा खेळताना पाहण्यासाठी प्रतीक्षा करू शकत नाही, आम्ही तुझी आठवण काढतो आणि तुझ्यावर प्रेम करतो.

Advertisement

पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर वॉर्नर आयपीएल खेळण्यासाठी भारतात जाणार आहे, त्यावेळी तो पुन्हा आपल्या कुटुंबाला भेटू शकणार आहे. यावेळी 26 मार्चपासून आयपीएल सुरू होणार आहे. या हंगामातील आयपीएलमधील काही सामने ऑस्ट्रेलियन दिग्गज खेळाडूला मुकणार आहेत. ऑस्ट्रेलियाचा पाकिस्तान दौरा 5 एप्रिलपर्यंत असेल. या आयपीएलमध्ये वॉर्नर दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना दिसणार आहे. आयपीएलच्या लिलावात वॉर्नरला दिल्लीने 6.25 कोटींना विकत घेत आपल्या संघात समाविष्ट केले होते.

Advertisement

खरेदिवाला म्हणजे ऑफरवाला. https://bit.ly/3gpEvq9 यावर क्लिक करून करा खरेदी दणक्यात..!

Advertisement

पाकिस्तानसोबतच्या मालिकेबद्दल बोलायचे झाले तर ऑस्ट्रेलिया पाकिस्तानसोबत 3 कसोटी, 3 एकदिवसीय आणि एक T20 सामना खेळणार आहे. पहिला कसोटी सामना रावळपिंडीत 4 ते 8 मार्च दरम्यान सुरू होणार आहे. त्याचवेळी, मालिकेतील दुसरा कसोटी सामना 12 ते 16 मार्च दरम्यान लाहोरमध्ये खेळवला जाईल, मालिकेतील शेवटचा कसोटी सामना 21 ते 25 मार्च दरम्यान लाहोरमध्ये खेळवला जाईल. याशिवाय रावळपिंडीत लहान फॉरमॅटचे सर्व सामने खेळवले जाणार आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply