Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

आता.. रोहीतच्या टार्गेटवर मॉर्गन आणि विल्यमसनचा ‘तो’ मोठा विक्रम; जाणून घ्या ‘त्या’बद्दल

मुंबई – भारत आणि श्रीलंका (IND vs Sri lanka) यांच्यातील टी-20 मालिकेत भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) अनेक विक्रम (Record) करू शकतो. पहिल्या सामन्यात श्रीलंकेचा 62 धावांनी पराभव करून भारतीय संघाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली असून दुसरा सामना जिंकून मालिका जिंकण्याची त्यांना इच्छा आहे. यासह टीम इंडिया सलग 11 वा टी-20 सामना जिंकू शकतो. त्याचबरोबर रोहित शर्माही बॅटने अनेक विक्रम करू शकतो. या सामन्यात रोहित इंग्लंडचा कर्णधार इऑन मॉर्गन आणि न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन यांचाही विक्रम मोडू शकतो.

Advertisement

भारतीय संघाचा नियमित कर्णधार झाल्यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने एकही सामना गमावलेला नाही. हिटमॅनला या मालिकेतही हा विक्रम कायम ठेवायला आवडेल.T20 मध्ये 1000 धावा करणारा रोहित तिसरा भारतीय कर्णधार बनू शकतो. रोहित शर्मा या सामन्यात कर्णधार म्हणून T20 मध्ये 1000 धावा पूर्ण करू शकतो. अशी कामगिरी करणारा तो तिसरा भारतीय कर्णधार ठरणार आहे. त्याच्या आधी महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली यांनी हा पराक्रम केला आहे.

Advertisement

Kharediwala घेऊन आलोय आलेय इंडियन ईकॉमर्स..!

Loading...
Advertisement

तर विल्यमसन आणि मॉर्गनचा विक्रमही हिटमॅन मोडेल
रोहितने कर्णधार म्हणून भारतात 15 सामने जिंकले आहेत. जर त्याने श्रीलंकेविरुद्धचा दुसरा T20 सामनाही जिंकला तर तो आपल्या देशात सर्वाधिक सामने खेळणारा कर्णधार बनेल. न्यूझीलंडच्या केन विल्यमसनने त्याच्या नेतृत्वाखाली घरच्या मैदानावर 30 टी-20 सामने खेळले आहेत आणि 15 जिंकले आहेत. त्याच वेळी, इंग्लंडच्या इऑन मॉर्गनने त्याच्या नेतृत्वाखाली घरच्या मैदानावर 25 आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळले आहेत आणि 15 जिंकले आहेत.

Advertisement

रोहित विराटलाही मागे सोडू शकतो
या सामन्यात सात चौकार मारून रोहित शर्मा विराट कोहलीला मागे सोडू शकतो. विराट सध्या टी20 मध्ये भारतासाठी सर्वाधिक चौकार मारणारा फलंदाज आहे. त्याने 298 चौकार तर रोहितने 292 चौकार मारले आहेत. रोहितने आठ चौकार मारले तर तो टी-20 मध्ये भारतासाठी 300 चौकार मारणारा पहिला फलंदाज ठरू शकतो. आयर्लंडच्या पॉल स्टर्लिनने आंतरराष्ट्रीय T20 मध्ये सर्वाधिक चौकार मारले आहेत. त्याच्या नावावर 319 चौकार आहेत.

Advertisement
Advertisement

Leave a Reply