Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

IND vs SL: सॅमसनला आणखी एक संधी?; जाणून घ्या टॉस पूर्वीच भारताची Playing 11

मुंबई – भारत आणि श्रीलंका (IND vs Sri lanka) यांच्यातील तीन टी ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना शनिवारी (26 फेब्रुवारी) धर्मशाला येथे होणार आहे. 24 फेब्रुवारी रोजी लखनौ येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या T20 सामन्यात टीम इंडियाने 62 धावांनी दणदणीत विजय मिळवून मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. दुसरा सामना जिंकून मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेण्याकडे त्यांची नजर असेल. कर्णधार रोहित शर्माला दुसऱ्या सामन्यात संघात फारसा बदल करायला आवडणार नाही.

Advertisement

या सामन्यात संजू सॅमसनला (Sanju Samson) आणखी एक संधी दिली जाऊ शकते. पहिल्या सामन्यात त्याला फलंदाजीची संधी मिळाली नाही. डावखुरा फिरकी गोलंदाज कुलदीप यादव (Kuldeep Yadav) संघात पुनरागमन करू शकतो. त्याला युझवेंद्र चहलच्या जागी संधी मिळू शकते. चहल गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सामने खेळत आहे. त्यामुळे त्यांना विश्रांती घेता येईल.

Advertisement

ऋतुराजच्या मनगटाला दुखापत
पहिल्या T20 सामन्यापूर्वी नेटमध्ये फलंदाजी करताना ऋतुराज गायकवाडच्या मनगटाला दुखापत झाली. तो रोहित शर्मासोबत ओपनिंगसाठी सज्ज झाला होता. दुर्दैवी दुखापतीमुळे संजू सॅमसनला खेळण्याची संधी मिळाली. रोहित आणि इशान किशन यांच्यातील 111 धावांच्या भागीदारीमुळे सॅमसनला फलंदाजीची संधी मिळाली नाही. त्याच्या जागी रवींद्र जडेजाला पसंती देण्यात आली. आता ऋतुराज दुखापतीमुळे संपूर्ण मालिकेतून बाहेर झाला असून त्याच्या जागी मयंक अग्रवालचा समावेश करण्यात आला आहे. अशा स्थितीत सॅमसनला संधी मिळण्याची खात्री आहे.

Loading...
Advertisement

Kharediwala घेऊन आलोय आलेय इंडियन ईकॉमर्स..!

Advertisement

सॅमसनसाठी दुसरा टी-20 सामना जीवघेण्या ठरू शकतो. याआधीही त्याला अनेकदा संधी मिळाल्या आहेत, पण त्याचा फायदा उठवण्यात सॅमसन अपयशी ठरला आहे. आता संधी मिळाल्याने त्यांना मोठी इनिंग खेळून आपली जागा वाचवायला आवडेल. या सामन्यात भुवनेश्वर कुमारऐवजी आवेश खानला संधी दिली जाऊ शकते. भुवनेश्वरला विश्रांती देऊन रोहित या युवा गोलंदाजाला आणखी एक संधी देऊ इच्छितो. वेस्ट इंडिजविरुद्ध आवेशचे T20 पदार्पण निराशाजनक होते.

Advertisement

दुसऱ्या T20 साठी भारताची संभाव्य प्लेइंग-11
रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), संजू सॅमसन, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, व्यंकटेश अय्यर, दीपक हुडा, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार/आवेश खान, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), युझवेंद्र चहल/कुलदीप यादव.

Advertisement
Advertisement

Leave a Reply