Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

भारतीय संघाचा ‘तो’ खेळाडू अडचणीत; ‘त्या’ प्रकरणात BCCI पाठवणार नोटीस

मुंबई – श्रीलंकेविरुद्धच्या (Sri lanka) कसोटी मालिकेतून वगळल्यानंतर रिद्धिमान साहा (wriddhiman Saha) सतत चर्चेत आहे. यापूर्वी त्यांनी बीसीसीआय (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली आणि राहुल द्रविड यांच्यावर संघात निवड न झाल्याबद्दल अनेक आरोप केले आणि त्यांच्यातील संभाषण सार्वजनिक केले. आता बीसीसीआय त्यांच्या अडचणी वाढवू शकते. सौरव गांगुली आणि राहुल द्रविड यांच्याशी झालेली संभाषणे सार्वजनिक केल्याप्रकरणी त्यांची चौकशी होऊ शकते. साहा सध्या बीसीसीआयच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट लिस्टमध्ये समाविष्ट आहे आणि त्याचे हे वक्तव्य बोर्डाच्या प्रोटोकॉलचे उल्लंघन करणारे आहे.

Advertisement

वार्षिक केंद्रीय करारामध्ये साहा ब गटात आहे. कराराच्या नियम 6.3 नुसार, कोणत्याही खेळाडूला क्रीडा अधिकारी, खेळातील कार्यक्रम, तंत्रज्ञानाचा वापर, संघाची निवड प्रक्रिया किंवा खेळाशी संबंधित इतर कोणत्याही विषयावर कोणतीही टिप्पणी करता येणार नाही.

Advertisement

बीसीसीआयचे खजिनदार अरुण धुमाळ यांनी या प्रकरणी सांगितले की, ‘बीसीसीआय ऋद्धिमानला विचारेल की तो करारबद्ध क्रिकेटपटू असताना निवडीच्या विषयांवर कसा बोलला. जोपर्यंत अध्यक्ष सौरव गांगुलीचा संबंध आहे, तो साहाला खेळण्यासाठी प्रेरित करू इच्छित होता. त्याने प्रशिक्षक राहुल द्रविडसोबतचे त्याचे इन-कॅमेरा संभाषण का सार्वजनिक केले हे कदाचित बोर्डाला जाणून घ्यायचे असेल. याबाबत त्याची चौकशी कशी करणार याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. प्रत्येकजण व्यस्त आहे, परंतु काही दिवसांत निर्णय होईल.

Advertisement

Kharediwala घेऊन आलोय आलेय इंडियन ईकॉमर्स..!

Loading...
Advertisement

काय म्हणाला साहा?
राहुल द्रविडबाबत साहा म्हणाला होता की, ‘मी यंदाच्या रणजी ट्रॉफीमध्ये सहभागी होणार नाही कारण टीम इंडियासाठी माझ्या नावाचा यापुढे विचार केला जाणार नाही, असे मला सांगण्यात आले आहे. तसेच प्रशिक्षक द्रविडने मला निवृत्तीचा सल्ला दिला.

Advertisement

गांगुलीने खोटे आश्वासन दिले
साहाने भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यावरही निशाणा साधला होता. साहाच्या म्हणण्यानुसार, गांगुलीने त्याला आश्वासन दिले होते की त्याने टीम इंडियातील त्याच्या स्थानाची चिंता करू नये. साहाने कानपूरमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात वेदनाशामक औषध घेत नाबाद 61 धावा केल्या, तेव्हा दादांनी निरोप पाठवून अभिनंदनही केले होते.

Advertisement

साहाच्या म्हणण्यानुसार, गांगुलीने त्याला सांगितले की, जोपर्यंत तो बीसीसीआयचा अध्यक्ष आहे, तोपर्यंत त्याला कशाचीही काळजी करण्याची गरज नाही. बोर्डाच्या अध्यक्षांचं असं बोलणं ऐकून साहाचा आत्मविश्वास खूप वाढला होता, पण आता एवढ्या लवकर सगळं कसं बदलून गेलं हे समजत नसल्याचं साहा सांगतो. त्याला खोटे आश्वासन देण्यात आले.

Advertisement
Advertisement

Leave a Reply