Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

IPL 2022: ठरल! पंजाब किंग्जचा कर्णधार ठरल; ‘हा’ खेळाडू स्वीकारणार जबाबदारी

मुंबई – भारतीय संघाचा सलामीवीर मयंक अग्रवालला (Mayank Agarwal) पंजाब किंग्जचा (Punjab kings) नवा कर्णधार बनवलं जाऊ शकतं. आयपीएल 2022 च्या मेगा लिलावापूर्वी (IPL Auction) संघाने त्याला कायम ठेवले. यानंतर त्यांच्याकडे संघाची कमान सोपवली जाईल, असे मानले जात होते. तथापि, अद्याप याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही, परंतु लवकरच फ्रेंचायझी मयंकला अधिकृत कर्णधार बनवू शकते. आयपीएलच्या दोन संघांपैकी पंजाब एक आहे ज्यांनी 2022 हंगाम सुरू होण्यापूर्वी अद्याप त्यांच्या कर्णधाराची घोषणा केलेली नाही.

Advertisement

पंजाब किंग्ज व्यतिरिक्त रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघानेही त्यांच्या नवीन कर्णधाराचे नाव जाहीर केलेले नाही. दक्षिण आफ्रिकेच्या फाफ डू प्लेसिसला या संघाचा कर्णधार बनवले जाऊ शकते. पीटीआयच्या वृत्तानुसार, या आठवड्यात मयंकला अधिकृतपणे पंजाबचे कर्णधार बनवले जाऊ शकते.

Advertisement

Kharediwala घेऊन आलोय आलेय इंडियन ईकॉमर्स..!

Loading...
Advertisement

राहुल लखनौचा कर्णधार झाला
पंजाबचा माजी कर्णधार लोकेश राहुलने मेगा लिलावापूर्वी संघ सोडण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर लखनौच्या संघाने त्याला ड्राफ्टमध्ये विकत घेतले. या मोसमात तो लखनौच्या संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. मात्र, राहुलच्या नेतृत्वाखाली संघाची कामगिरी फारशी खास नव्हती आणि गेल्या मोसमात त्याच्या संघाने अनेक जवळचे सामने गमावले. हा संघ गुणतालिकेत सहाव्या स्थानावर होता. पंजाबने 14 पैकी सहा सामने जिंकले होते, तर 8 सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.

Advertisement

2022 च्या मेगा लिलावापूर्वी पंजाबने सर्वात कमी खेळाडूंना कायम ठेवले होते. मयंक अग्रवाल व्यतिरिक्त पंजाबने युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला कायम ठेवले होते. हा संघ लिलावात सर्वाधिक पैसे घेऊन उतरला. आता या संघात शिखर धवन, कागिसो रबाडा, लियाम लिव्हिंगस्टोन आणि जानी बेअरस्टो सारखे सर्वोत्तम खेळाडू आहेत.

Advertisement
Advertisement

Leave a Reply