Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

रोहीत बनणार राजा; बाबर आझमचा ‘तो’ विक्रम मोडणार

मुंबई – वेस्ट इंडिजविरुद्ध (West Indies) टी-20 आणि एकदिवसीय मालिकेत शानदार विजय नोंदवल्यानंतर भारतीय संघ आता श्रीलंकेविरुद्ध (Sri Lanka) टी-20 मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिला T20 सामना लखनौमध्ये खेळवला जाणार आहे. टी-20 मालिकेत भारताचा कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) एका मोठ्या विक्रमाची बरोबरी करण्याची संधी आहे. खरंतर रोहित शर्मा कर्णधार म्हणून T20 मध्ये 1000 धावा पूर्ण करण्याच्या जवळ आहे, 63 धावा करताच तो एक कर्णधार म्हणून T20 आंतरराष्ट्रीय मध्ये 1000 धावा पूर्ण करेल. हे करून तो पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमची (Babar Azam) बरोबरी करेल.

Advertisement

टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून सर्वात जलद 1000 धावा करण्याचा विक्रम बाबर आझमच्या नावावर आहे. आझमने 26 डावात कर्णधार म्हणून हा पराक्रम केला. रोहितने आतापर्यंत 25 डावात 927 धावा केल्या आहेत. म्हणजेच लखनौ T20 मध्ये रोहितने 63 धावा केल्या तर तो बाबर आझमच्या विक्रमाची बरोबरी करेल.

Advertisement

तसे, भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने कर्णधार म्हणून 30 डावात 1000 धावा पूर्ण केल्या होत्या. तिसऱ्या क्रमांकावर फाफ डू प्लेसिस आहे, ज्याने कर्णधार म्हणून 31 डावांत 1000 धावा पूर्ण केल्या. त्याचवेळी अॅरॉन फिंचने 32 डावांमध्ये असा पराक्रम केला होता, तर केन विल्यमसनने 36 डावांमध्ये हा पराक्रम केला होता.

Loading...
Advertisement

Kharediwala घेऊन आलोय आलेय इंडियन ईकॉमर्स..!

Advertisement

या विक्रमाशिवाय रोहित शर्मा टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणारा मार्टिन गप्टिलचा विक्रम मोडण्याच्या जवळ आहे. हिटमॅनने 37 धावा केल्‍याबरोबरच तो टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्‍ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनेल. रोहितच्या नावावर आतापर्यंत 3263 धावा झाल्या आहेत. त्याचबरोबर गप्टिलने 3299 धावा केल्या आहेत. किंग कोहलीला 3296 धावा करता आल्या आहेत. म्हणजेच रोहितला कोहली आणि गप्टिलचे विक्रम मोडण्याची संधी असेल.

Advertisement

भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध 3 टी-20 आणि 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ धुमाकूळ घालत आहे. टीम इंडिया 2016 नंतर प्रथमच ICC T20 क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे. रोहित पूर्ण कर्णधार असल्याने भारतीय संघाने आतापर्यंत टी-20 मालिका गमावलेली नाही.

Advertisement
Advertisement

Leave a Reply