Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

BAN vs AFG: बांगलादेशचा ऐतिहासिक रन चेस; रचला इतिहास, जाणुन घ्या संपूर्ण माहिती

मुंबई – अफगाणिस्तानविरुद्धच्या (Afghanistan) पहिल्या एकदिवसीय सामन्यात बांगलादेशने (Bangladesh) 4 गडी राखून विजय मिळवला. बांगलादेशचा हा विजय खूप खास आहे. एकेकाळी लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशच्या 6 विकेट 45 धावांत पडल्या होत्या, मात्र त्यानंतर अफिफ हुसेन आणि मेहदी हसनने सहाव्या विकेटसाठी नाबाद 174 धावांची भागीदारी करून एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात ऐतिहासिक विजयाची नोंद केली आहे. वनडे क्रिकेटमधील 7व्या विकेटसाठी ही दुसरी सर्वोच्च भागीदारी आहे. या प्रकरणात, वनडे क्रिकेटमध्ये 7व्या विकेटसाठी सर्वोच्च भागीदारीचा विक्रम जोस बटलर आणि आदिल रशीदच्या नावावर आहे. दोघांनी 2015 मध्ये बर्मिंगहॅम वनडेमध्ये न्यूझीलंडविरुद्ध 177 धावांची भागीदारी केली होती.

Advertisement

या सामन्यात अफगाणिस्तानने बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अफगाणिस्तानने 49.1 षटकात 215 धावा केल्या होत्या. त्यानंतर बांगलादेशने 48.5 षटकांत 6 गडी गमावून लक्ष्य गाठले. अफिफ हुसैनने 115 चेंडूत 11 चौकार आणि 1 षटकारासह नाबाद 93 धावा केल्या. त्याचवेळी मेहदी हसनने 120 चेंडूत 81 धावांची नाबाद खेळी खेळली, हसनने आपल्या खेळीत 9 चौकार मारले.

Advertisement

Kharediwala घेऊन आलोय आलेय इंडियन ईकॉमर्स..!

Loading...
Advertisement

तत्पूर्वी, अफगाणिस्तानकडून नजीबुल्लाह झद्रानने 84 चेंडूत 67 धावा केल्या, त्यामुळे अफगाणिस्तान संघाला 215 धावांपर्यंत मजल मारता आली. नजीबुल्लाशिवाय रहमत साहने 34 धावा केल्या. बांगलादेशच्या मुस्तफिजुर रहमानने अप्रतिम गोलंदाजी करत 3 गडी बाद केले. बांगलादेशच्या गोलंदाजांनी अफगाणिस्तानच्या फलंदाजांना सुरुवातीपासूनच बांधून ठेवले. दुसरीकडे अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनीही बांगलादेशच्या फलंदाजांना चांगलाच त्रास दिला. फझलहक फारुकीने 4 बळी घेत बांगलादेशच्या फलंदाजांचे कंबरडे मोडले.

Advertisement

एका क्षणी बांगलादेशला सामना वाचवणे कठीण झाले होते. पण क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ असल्याचं म्हटलं जातं. संघाच्या 6 विकेट 45 धावांवर पडल्या तेव्हा बांगलादेश येथून सामना जिंकू शकेल याची कोणालाच खात्री नव्हती. मात्र यानंतर अनिश्चिततेने अफीफ हुसैन आणि मेहदी हसन यांनी भागीदारी करत अफगाणिस्तानच्या गोलंदाजांना विकेट्ससाठी वेठीस धरले. अशक्य ते शक्य करून दाखवत बांगलादेशने अखेर ऐतिहासिक विजयाची नोंद केली. आता बांगलादेश मालिकेत अफगाणिस्तान 1-0 ने पुढे आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply