Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

दिल्लीचा संघ झाला आणखी मजबूत; आता ‘या’ स्टार ऑलराउंडरने संघात केला प्रवेश

मुंबई – इंडियन प्रीमियर लीगच्या 15 व्या (IPL 2022) हंगामातील खेळाडूंची लिलाव प्रक्रिया (Mega Auction) बेंगळुरूमध्ये पूर्ण झाली. लिलाव प्रक्रियेदरम्यान, दिल्ली कॅपिटल्सच्या (DC) संघानेही उत्साहाने भाग घेतला आणि आपल्या संघात अनेक स्टार खेळाडूंचा समावेश केला.

Advertisement

यामध्ये ऑस्ट्रेलियन स्टार सलामीवीर डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, शार्दुल ठाकूर, मुस्तफिजुर रहमान, कुलदीप यादव यांसारख्या दिग्गज खेळाडूंची नावे प्रमुख होती. इतकेच नाही तर आता टीम इंडियाचा 44 वर्षीय माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकर (Ajit Agarkar) देखील सहाय्यक प्रशिक्षक म्हणून दिल्ली संघात सामील झाला आहे. यादरम्यान तो संघाचे मुख्य प्रशिक्षक पाँटिंगसह कोचिंग स्टाफच्या अनेक महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहे.

Advertisement

मिक्सर खरेदीवरही मोठी सूट.. ऑफर पाहण्यासाठी आजच https://bit.ly/3gKdz4F यावर क्लिक करा

Loading...
Advertisement

दिल्ली संघाने आगामी हंगामासाठी मोहम्मद कैफ आणि अजय रात्रा यांच्यासोबतचा करार वाढवला नाही. कैफ 2019 पासून संघात सहाय्यक प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसला होता. त्याच वेळी, फ्रँचायझीने गेल्या हंगामात कोचिंग स्टाफमध्ये भर घातली आहे. अजित आगरकर याआधी कोणत्याही संघासाठी प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसलेला नाही. भारताच्या या दिग्गज खेळाडूने 2013 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. आगरकरने भारतीय संघासाठी 26 कसोटी क्रिकेट सामने खेळले असून 46 डावात 47.3 च्या सरासरीने 58 विकेट्स घेतल्या आहेत.

Advertisement

त्याच्या एकदिवसीय क्रिकेटबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने या फॉरमॅटमध्ये देशासाठी 191 सामने खेळले आहेत आणि 188 डावांमध्ये 27.9 च्या सरासरीने 288 विकेट्स घेतल्या आहेत. कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटशिवाय त्याने भारतीय संघासाठी चार टी-20 सामनेही खेळले आहेत. यादरम्यान त्याने 28.3 च्या सरासरीने तीन डावात तीन विकेट मिळवले आहे.

Advertisement

आगरकरने आयपीएलमध्येही सहभाग घेतला आहे. देशाच्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत 42 सामने खेळताना त्याने 42 डावात 39.7 च्या सरासरीने 29 विकेट्स घेतल्या आहेत.याशिवाय, त्याच्या फलंदाजीच्या कामगिरीबद्दल, त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 571 धावा, एकदिवसीय क्रिकेटमध्ये 1269 आणि T20 क्रिकेटमध्ये 15 धावा केल्या आहेत. याशिवाय आयपीएलमध्ये त्याच्या बॅटमधून 179 धावा झाल्या आहेत.

Advertisement
Advertisement

Leave a Reply