Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

IPL 2022: आता BCCI देणार महाराष्ट्राला मोठा गिफ्ट, जाणुन घ्या ‘त्या’ बद्दल

मुंबई – आयपीएल सीझन 15 (IPL 2022) चे सामने मुंबई(Mumbai) , पुणे (Pune) आणि अहमदाबाद (Ahmedabad) येथे खेळवले जाऊ शकतात. गुरुवारी होणाऱ्या आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत या निर्णयाला मंजुरी मिळू शकते. सर्वाधिक 55 सामने मुंबईत खेळवले जातील, असे मानले जात आहे. 15 सामने पुण्यात तर 4 सामने अहमदाबादमध्ये होणार आहेत. प्ले-ऑफ आणि फायनलचे ठिकाण अद्याप निश्चित झालेले नाही. या सामन्यांच्या यजमानपदाच्या शर्यतीत अहमदाबाद आघाडीवर आहे.

Advertisement

मुंबईतील वानखेडे, डीवाय पाटील आणि ब्रेबॉर्न स्टेडियमवर सामने होणार आहेत. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर हे सामने होणार आहेत. सर्व 10 संघांचे प्रत्येकी चार सामने वानखेडे आणि डीवाय पाटील स्टेडियमवर होतील. त्याचवेळी ब्रेबॉर्न आणि एमसीए स्टेडियममध्ये प्रत्येकी तीन सामने होतील. अंतिम सामना 29 मे रोजी होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Advertisement

मिक्सर खरेदीवरही मोठी सूट.. ऑफर पाहण्यासाठी आजच https://bit.ly/3gKdz4F यावर क्लिक करा

Loading...
Advertisement

तर दुसरीकडे आयपीएल 2022 साठी दिल्ली कॅपिटल्सने(DC) माजी भारतीय वेगवान गोलंदाज अजित आगरकर (Ajit Agarkar) यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. आगरकर यांना संघाचे सहाय्यक प्रशिक्षक करण्यात आले आहे. फ्रेंचायझीने सोशल मीडियाच्या (Social media) माध्यमातून ही माहिती दिली. याआधी संघाचे सहाय्यक प्रशिक्षक मोहम्मद कैफ होते, पण यावेळी फ्रँचायझीने त्याचा करार वाढवला नाही. कैफने 2019 ते 2022 पर्यंत हे पद भूषवले होते.

Advertisement

2013 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेला अजित आगरकर याआधी कोणत्याही संघासाठी प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसला नाही. रिकी पाँटिंग हा दिल्ली कॅपिटल्सचा मुख्य प्रशिक्षक असून कर्णधार ऋषभ पंत आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply