Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

अर्र… श्रीलंकेविरुद्ध चमकणार नाही भारताचा सूर्य; जाणुन घ्या नेमका कारण

मुंबई – वेस्ट इंडिजविरुद्धच्या (West Indies) टी-20 मालिकेत टीम इंडियाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावणारे सूर्यकुमार यादव (SuryaKumar Yadav)आणि दीपक चहर (Deepak chahar) हे श्रीलंकेविरुद्धच्या (SRI lanka) आगामी टी-20 मालिकेतून बाहेर पडले आहेत. सूर्यकुमारला हेअरलाइन फ्रॅक्चर झाले असून संघ व्यवस्थापनाने त्याला टी-20 मालिकेसाठी अनफिट घोषित केले आहे.

Advertisement

कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर वेस्ट इंडिजविरुद्धच्या शेवटच्या टी-20 सामन्यात क्षेत्ररक्षण करताना 31 वर्षीय सूर्यकुमारला दुखापत झाली. सूर्यकुमारला वेस्ट इंडिजविरुद्धच्या T20 मालिकेत प्लेयर ऑफ द सिरीजचा किताबही देण्यात आला होता.

Advertisement

Kharediwala घेऊन आलोय आलेय इंडियन ईकॉमर्स..!

Advertisement

दीपक चहरही टी-20 मालिकेतून बाहेर
दीपक चहरनंतर आगामी T20 मालिकेतून बाहेर पडणारा सूर्या हा दुसरा भारतीय खेळाडू आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या T20 सामन्यात गोलंदाजीसाठी धाव घेताना दीपकला उजव्या मांडीला दुखापत झाली. त्यानंतर त्याला आपल्या कोट्यातील चार षटकेही टाकता आली नाहीत. त्याला पुन्हा डगआऊटमध्ये पाठवण्यात आले होते.

Loading...
Advertisement

बीसीसीआयने सूर्यकुमार आणि चहरच्या दुखापतीला अधिकृत दुजोरा दिला आहे. मात्र, त्यांच्या बदलीची घोषणा झालेली नाही. दीपकच्या अनुपस्थितीत उपकर्णधार जसप्रीत बुमराहसह अनेक वेगवान गोलंदाज संघात आहेत. अशा स्थितीत मंडळाला इतर कोणालाही संधी द्यायची नाही.

Advertisement

सूर्यकुमार आणि दीपक आता बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये (NCA) जाणार आहेत. दीपक पाच ते सहा आठवडे पुनर्वसनात असेल. अशा परिस्थितीत आता तो आयपीएलच्या 15 व्या आवृत्तीत थेट चेन्नई सुपर किंग्ज (CSK) सोबत खेळताना दिसणार आहे. दीपकला सीएसकेने यंदाच्या मेगा लिलावात 14 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. त्याचबरोबर सूर्याला थेट आयपीएलमध्येही पाहता येणार आहे. त्याला मुंबई इंडियन्सने कायम ठेवले आहे.

Advertisement

सूर्यकुमार मंगळवारी टीम इंडियाच्या सराव सत्रातही सहभागी झाला होता. मात्र, त्याने फारसा सराव केला नाही. आता तो काही दिवस विश्रांती घेऊ शकतो. भारत 24 फेब्रुवारीला श्रीलंकेविरुद्ध पहिला टी-20 खेळणार आहे. यानंतर, दोन्ही संघ पुढील दोन टी-20 सामन्यांसाठी धर्मशाला येथे जातील. हे दोन्ही सामने 26 आणि 27 फेब्रुवारीला होणार आहेत.

Advertisement

T20 मालिकेसाठी भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, दीपक हुडा, रवींद्र जडेजा, युझवेंद्र चहल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज , भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), आवेश खान.

Advertisement
Advertisement

Leave a Reply