मुंबई – पाकिस्तान सुपर लीग (PSL 2022) मध्ये शाहिद आफ्रिदीचा (Shahid Afridi) ‘जावई’ शाहीन आफ्रिदीने (Shaheen Afridi) यावेळी बॅटने सर्वांना आश्चर्यचकित केले. लाहोर कलंदर संघाला पराभवाचा सामना करावा लागला असला तरी शाहीनच्या स्टाईलने क्रिकेटप्रेमींची मने जिंकली आहेत. त्याचवेळी शाहीनचा ‘सासरा’ शाहिद आफ्रिदीही आपल्या जावईची फलंदाजी पाहून ट्विट केल्याशिवाय राहू शकला नाही. माजी पाकिस्तानी क्रिकेटरने शाहीनचा एक खास फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये तो त्याच्याप्रमाणेच फलंदाजी करताना सेलिब्रेशन करत आहे. या फोटोवर चाहत्यांच्या अनेक कमेंट्सही येत आहेत. फोटो ट्विट करताना शाहिदने आपल्या जवाईचे नाव असे लिहिले आहे. ‘SHAHEEN AFRIDIIII YOU BEAUTYYY!!!’.
2021 मध्येच शाहिद आफ्रिदीने ट्विट करून सांगितले होते की, शाहीनच्या कुटुंबीयांनी लग्नासाठी माझ्याशी संपर्क साधला आहे, आम्ही त्याबद्दल बोलत आहोत. मात्र, ते लग्न करणार की नाही, याबाबत दोघांकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
Kharediwala घेऊन आलोय आलेय इंडियन ईकॉमर्स..!
त्याचवेळी सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, पेशावर झल्मीने लाहोरचा सुपर ओव्हरमध्ये पराभव केला. दोन्ही संघांनी 158 धावा केल्यामुळे सामना बरोबरीत सुटला. या सामन्यात शाहीनने आपल्या फलंदाजीने उत्कृष्ट कामगिरी केली आणि सामना बरोबरीत आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. लाहोरला शेवटच्या चेंडूवर 7 धावांची गरज होती.
अशा स्थितीत शाहीनने षटकार ठोकत सामना बरोबरीत सोडवला. नंतर सुपर ओव्हरमध्ये शोएब मलिकने शाहीनविरुद्ध 2 चौकार मारून आपल्या संघाला विजय मिळवून दिला. पण शाहीन आफ्रिदीने आपल्या फलंदाजीने सामन्यातील सर्व मथळे लुटले. शाहीनने 20 चेंडूत 2 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 39 धावांची नाबाद खेळी खेळली आणि सामना रोमांचक बनवला.