मुंबई – पत्रकाराच्या मुद्द्यावरून रिद्धिमान साहा (wriddhiman Saha) यांनी पुन्हा एकदा प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी कु अॅपच्या माध्यमातून या मुद्द्यावर पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे आभार मानले आहेत. आपले म्हणणे मांडताना साहा म्हणाले की, मी त्या प्रसिद्ध पत्रकाराचे (Journalist) नाव उघड करणार नाही. साहाने लिहिले, ‘ज्यांनी पाठिंबा दर्शवला आणि मदत करण्याची इच्छा व्यक्त केली त्या सर्वांचे मी आभारी आहे. माझी कृतज्ञता कोणाचे करिअर संपविण्याचे कोणाचेही नुकसान करणे हा माझा स्वभाव नाही.
त्यामुळे मानवतेच्या आधारावर त्याच्या कुटुंबाचा विचार करून मी सध्या नाव उघड करत नाही. पण अशी पुनरावृत्ती झाली तर मी मागे हटणार नाही. असे वागणे खपवून घेतले जाऊ नये असे मला वाटले आणि मला कोणीही अशा प्रकारच्या त्रासातून जावे असे वाटत नव्हते. मी ठरवले की बाहेर जाऊन त्या गोष्टी लोकांसमोर आणीन, पण त्याचे नाव घेणार नाही.
काही दिवसांपूर्वी साहाने ट्विटरवर एक स्क्रीनशॉट शेअर केला होता ज्यामध्ये एक पत्रकार त्याला मुलाखत देण्यासाठी धमकावत होता. या ट्विटनंतर माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, वीरेंद्र सेहवाग आणि हरभजन सिंग या माजी खेळाडूंनी साहाला पाठिंबा दिला आणि पत्रकाराचे नाव उघड करण्यास सांगितले.
Kharediwala घेऊन आलोय आलेय इंडियन ईकॉमर्स..!
नुकतीच भारतीय संघाकडून खेळण्याची संधी न मिळालेल्या साहाने प्रसारमाध्यमांना सांगितले की, गेल्या महिन्यात दक्षिण आफ्रिकेच्या मालिकेनंतर द्रविडने त्याला परस्पर चर्चेतून निवृत्ती घेण्याचा विचार करण्याचा सल्ला दिला होता. द्रविड म्हणाला की, साहाशी बोलण्यामागचा हेतू हा होता की त्याला संघातील त्याच्या स्थानाची स्पष्ट कल्पना आहे आणि त्याला पश्चात्ताप होणार नाही.