Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

24 वर्षांनंतर होणाऱ्या ‘त्या’ दौऱ्यासाठी कांगारूंचा संघ जाहीर; मात्र…..

मुंबई – ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ (Australia cricket team) 24 वर्षांनंतर पाकिस्तान दौऱ्यावर (Tour of Pakistan) जात आहे. मार्चमध्ये ही मालिका आयोजित केली जाणार आहे. या मालिकेत 3 कसोटी, 3 वनडे आणि एक टी-20 सामना खेळवला जाणार आहे. ऑस्ट्रेलियाने वनडे आणि टी-20 साठी आपला संघ जाहीर केला आहे. या संघात ऑस्ट्रेलियाची फार मोठी नावे नाहीत. डेव्हिड वॉर्नर, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क आणि जोश हेझलवूड यांना संघात स्थान मिळालेले नाही. हे खेळाडू आयपीएल 2022 मध्येही दिसणार आहेत. याशिवाय ग्लेन मॅक्सवेलच्या लग्नामुळे त्याने मालिकेतून ब्रेक घेतला आहे.

Advertisement

6 एप्रिलपर्यंत खेळाडूंना रजा नाही
ऑस्ट्रेलियाचे 5 मोठे खेळाडू पाकिस्तानविरुद्धच्या वनडे आणि टी-20 मालिकेतून बाहेर आहेत. आयपीएलमुळे या खेळाडूंना विश्रांती देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे, मात्र त्यांना क्रिकेट ऑस्ट्रेलियाने 6 एप्रिलपर्यंत सुट्टी दिलेली नाही. अशा परिस्थितीत ते आयपीएल 2022 च्या पहिल्या आठवड्यात खेळताना दिसणार की नाही हे सांगणे कठीण आहे.

Advertisement

ऑस्ट्रेलिया 1998 नंतर पाकिस्तान दौऱ्यावर
ऑस्ट्रेलियाचा संघ 1998 नंतर पाकिस्तानच्या दौऱ्यावर जात आहे. ऑस्ट्रेलिया संघाने शेवटची वेळ 1998 मध्ये पाकिस्तानचा दौरा केला होता. तेव्हा मार्क टेलर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार होता. ऑस्ट्रेलियाने 3 कसोटी सामन्यांची मालिका 1-0 ने जिंकली होती.

Advertisement

रावळपिंडीत पाच सामने
या मालिकेतील पहिला कसोटी सामना रावळपिंडीत 4 मार्चपासून खेळवला जाणार आहे. शेवटचे दोन कसोटी सामने कराची आणि लाहोर येथे होणार आहेत. रावळपिंडीत तीन एकदिवसीय आणि एक टी-20 सामने होणार आहेत. उभय संघांमधील सात सामन्यांपैकी पाच रावळपिंडी येथे खेळवले जातील. ऑस्ट्रेलियाचा संघ 27 फेब्रुवारीला इस्लामाबादला पोहोचणार आहे. येथे सर्व खेळाडू एका दिवसासाठी आयसोलेशनमध्ये असतील.

Loading...
Advertisement

खरेदिवाला सर्वांसाठी..! ऑफर आणि लव्ह एनकॅशसाठी आजच Kharediwala वर जाऊन आपल्या प्रियजनांना भेटवस्तू पाठवा

Advertisement

वनडे आणि टी-20 साठी संघ

Advertisement

आरोन फिंच (कर्णधार), शॉन अॅबॉट, अॅस्टन आगर, जेसन बेहरेनडॉर्फ, अॅलेक्स कॅरी, नॅथन एलिस, कॅमेरॉन ग्रीन, ट्रॅव्हिस हेड, जोस इंग्लिस, मार्नस लॅबुशेन, मिचेल मार्श, बेन मॅकडर्मॉट, केन रिचर्डसन, स्टीव्ह स्मिथ, मार्कस स्टॉइनिस, अॅडमॅम्प

Advertisement
Advertisement

Leave a Reply