मुंबई – भारताचा (India) माजी कर्णधार विराट कोहलीला(Virat Kohli) वेस्ट इंडिजविरुद्धच्या (Westindies) शेवटच्या टी-20 आणि श्रीलंकेविरुद्धच्या (SRI lanka) टी-20 मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. त्यानंतर विराटने ट्विटरवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये दहा विराट दिसत आहेत. कोहलीने 10 विराटपैकी खरा विराट ओळखण्यास सांगितले आहे. हा फोटो पाहून चाहतेही संभ्रमात आहेत.या फोटोवर चाहत्यांनी मजेशीर कमेंट्सही केल्या आहेत.
कोहलीच्या पोस्टवर एका चाहत्याने एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये विराट कोहली आणि लोक त्याच्यासोबत फोटो क्लिक करत आहे मात्र तो कोहलीचा डुप्लिकेट आहे.
विराट कोहलीच्या पोस्टवर आणखी एका चाहत्याने मजेशीर कमेंट केली आहे. त्याने लिहिले की, 10 विराटमध्ये हा बाबर आझम कुठून आला?
कोहली मोहालीत 100वी कसोटी खेळणार
विराट कोहली पुढील महिन्यात मोहालीत श्रीलंकेविरुद्ध 100 वा कसोटी सामना खेळणार आहे. त्याचबरोबर या खेळाडूला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएलमध्ये कायम ठेवले आहे. विराट कोहलीच्या 71व्या शतकाची दोन वर्षांपासून चाहते वाट पाहत आहेत.
आपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना..? मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा
विराट कोहलीने नोव्हेंबर 2019 मध्ये बांगलादेशविरुद्ध दिवस-रात्र कसोटीत शेवटचे शतक झळकावले होते. वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या टी-20मध्ये विराटने शानदार अर्धशतक झळकावत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती . सध्या कोहली आपल्या कुटुंबासह सुट्टीचा आनंद घेत आहे.