Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

IND vs SL: श्रीलंकेचे हे खेळाडू देणार भारताला टक्कर;T20 मालिकेसाठी संघ जाहीर

मुंबई – श्रीलंकेच्या (SRI lanka) संघाने भारताविरुद्धच्या(India) टी-20 मालिकेसाठी (T20 Series) संघाची घोषणा केली आहे. यावेळी संघात नव्या चेहऱ्याला संधी देण्यात आली आहे. आशयन डॅनियलला लिस्ट-ए मध्ये उत्कृष्ट कामगिरीची भेट देण्यात आली आहे. मात्र, स्फोटक मधल्या फळीतील फलंदाज भानुका राजपक्षेला खराब फिटनेसमुळे संघातून वगळण्यात आले आहे. 2021 मध्ये भारताने श्रीलंकेचा दौरा केला तेव्हा राजपक्षे यांची कामगिरी उत्कृष्ट होती.

Advertisement

श्रीलंकेचा संघ नुकताच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या T20I मालिकेत 4-1 ने पराभूत झाला होता. या मालिकेत श्रीलंकेचे तीन खेळाडू जखमी झाले होते. यामध्ये फलंदाज अविष्का फर्नांडो, अष्टपैलू रमेश मेंडिस आणि वेगवान गोलंदाज नुवान तुषारा यांचा समावेश आहे. कुशल परेरा बऱ्याच दिवसांपासून दुखापतीशी झुंज देत आहे.

Advertisement

त्याचवेळी दनुष्का गुनाथिलका आणि दिनेश चंडिमल यांनी संघातील आपली जागा वाचवण्यात यश मिळवले आहे. या दोघांना ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत प्लेइंग-11 मध्ये स्थान मिळाले नाही. त्याचबरोबर फलंदाज कामिल मिश्रा आणि जेनिथ लियानेज यांचाही संघात समावेश करण्यात आला आहे. कोरोना पॉझिटिव्हमुळे ऑस्ट्रेलियन दौऱ्याला मुकलेले मिस्ट्री स्पिनर वनिंदू हसरंगा आणि बिनुरा फर्नांडो संघात परतले आहेत.

Loading...
Advertisement

भारत आणि श्रीलंका मालिकेचे वेळापत्रक
श्रीलंकेचा संघ भारत दौऱ्यावर तीन टी-20 आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे. पहिला T20 सामना 24 फेब्रुवारीला लखनौमध्ये खेळवला जाईल. यानंतर 26 आणि 27 फेब्रुवारीला धर्मशाला येथे दोन टी-20 सामने खेळवले जातील. मोहालीत कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. पहिला सामना 4 मार्च ते 8 मार्च या कालावधीत होणार आहे. यानंतर दुसरी आणि अंतिम कसोटी 12 ते 16 मार्च दरम्यान बेंगळुरू येथे होणार आहे.

Advertisement

Kharediwala घेऊन आलोय आलेय इंडियन ईकॉमर्स..!

Advertisement

T20 मालिकेसाठी श्रीलंकेचा संघ: दासुन शनाका (कर्णधार), पथुम निसांका, कुसल मेंडिस, चरिथ अस्लंका, दिनेश चंडीमल, दनुष्का गुनाथिलका, कामिल मिश्रा, जेनिथ लियानेज, वनिंदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, दुष्मंथा चमिरा, महिषुरा, माहिरो, बी. फर्नांडो थेक्शाना, जेफ्री वांडरसे, प्रवीण जयविक्रम, आशियान डॅनियल्स

Advertisement
Advertisement

Leave a Reply