Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

जे सचिन आणि द्रविड जमले नाही; ते ‘या’ 19 वर्षीय खेळाडूने करुन दाखवले

मुंबई – 19 वर्षांखालील विश्वचषकात (Under 19 World Cup) आपल्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला चॅम्पियन बनवणाऱ्या यश धुलने (Yash dhull) आपल्या रणजी (Ranji Trophy) कारकिर्दीची शानदार सुरुवात केली आहे. पदार्पणाच्या सामन्यात त्याने दोन्ही डावात शतके झळकावली आहे. पदार्पणाच्या सामन्यात दोन्ही डावात शतक झळकावणारा धुल हा तिसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. तामिळनाडूविरुद्धच्या सामन्यात धुलने दोन्ही डावात 113 धावा केल्या. मात्र, दिल्लीच्या संघाला हा सामना जिंकता आला नाही आणि शेवटी सामना अनिर्णित राहिला.

Advertisement

भारतासाठी कसोटीत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सचिन, द्रविड आणि विराटसारखे फलंदाज ही कामगिरी करू शकलेले नाहीत. धुलपूर्वी, पहिल्या रणजी सामन्याच्या दोन्ही डावात केवळ दोन भारतीय फलंदाजांना शतके झळकावता आली होती. गुजरातच्या नारी कॉन्ट्रॅक्टरने 1952/53 मध्ये 152 आणि 102 धावा केल्या होत्या. त्याचवेळी महाराष्ट्राच्या विराग आवटेने 2012/13 मध्ये 126 आणि 112 धावा केल्या होत्या.

Advertisement

यश धुलने सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांना मागे टाकले आहे. सचिनने आपल्या पहिल्या रणजी सामन्यातही शतक झळकावले, पण त्याला दोन्ही डावात ही कामगिरी करता आली नाही. त्याच वेळी, विराट अंडर-19 विश्वचषक जिंकल्यानंतर सहा महिन्यांनी भारतीय संघात आला होता आणि रणजी ट्रॉफीमध्ये बरेच सामने खेळला नव्हता. पण पहिल्या सामन्यात त्याच्या बॅटने शतक झळकावले नाही.

Loading...
Advertisement

Kharediwala घेऊन आलोय आलेय इंडियन ईकॉमर्स..!

Advertisement

रणजी ट्रॉफीच्या दोन्ही डावात शतक करणारा एसएम कादरी हा पहिला फलंदाज होता. त्याने 105 आणि 114 धावा केल्या. डिसेंबर 1935 मध्ये बॉम्बे आणि वेस्टर्न इंडिया यांच्यात झालेल्या सामन्यात कादरी यांनी बॉम्बेसाठी दोन्ही डावात शतके झळकावली. मन्सूर अली खान पतौडी हा दिल्लीसाठी दोन्ही डावात शतक करणारा पहिला फलंदाज होता. त्यांच्यानंतर सुरिंदर खन्ना, मदन लाल, अजय शर्मा, रमन लांबा, ऋषभ पंत आणि आता यश धुल यांनी हा पराक्रम केला आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply