Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

BCCI ने घेतला निर्णय अन् पुन्हा धोनीचे ठरला खरा; सात वर्षांपूर्वी केली होती भविष्यवाणी

मुंबई – श्रीलंकेविरुद्धच्या (Ind vs SRI lanka) कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. टी-20 आणि वनडेनंतर (ODI) आता कसोटी (Test) संघाची कमानही रोहित शर्माकडे (Rohit Sharma) सोपवण्यात आली आहे. तिन्ही फॉरमॅटमध्ये रोहित कर्णधार झाल्यानंतर धोनीची सात वर्षे जुनी गोष्ट पुन्हा एकदा खरी ठरली आहे. भारताकडे तिन्ही फॉरमॅटमध्ये एकच कर्णधार असेल, असे धोनी म्हणाला होता. इथे प्रत्येक फॉरमॅटसाठी वेगळा कर्णधारपदाचा फॉर्म्युला चालणार नाही. हे विधान केल्यानंतर धोनीने 2016 च्या अखेरीस एकदिवसीय संघाचे कर्णधारपद सोडले आणि विराट तिन्ही फॉरमॅटमध्ये भारताचा कर्णधार बनला.

Advertisement

तब्बल सात वर्षांनंतर धोनीचे म्हणणे पुन्हा एकदा खरे ठरले आहे. प्रदीर्घ काळ भारताच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये कर्णधारपद भूषवल्यानंतर विराटने टी-20 कर्णधारपद सोडले. कामाचा ताण कमी करण्यासाठी आणि एकदिवसीय-कसोटीमध्ये अधिक लक्ष केंद्रित करण्यासाठी आपण हे करत असल्याचे त्याने सांगितले. मात्र, तसे झाले नाही. T20 नंतर, त्याच्याकडून एकदिवसीय कर्णधारपद काढून घेण्यात आले आणि नंतर त्याला कसोटीचे कर्णधारपदही सोडावे लागले.

Advertisement

Kharediwala घेऊन आलोय आलेय इंडियन ईकॉमर्स..!

Loading...
Advertisement

रोहित तिन्ही फॉरमॅटमध्ये कर्णधार
नोव्हेंबर 2021 पर्यंत भारतीय संघाकडे तिन्ही फॉरमॅटमध्ये एकच कर्णधार होता. विराट कोहली प्रत्येक फॉरमॅटमध्ये टीम इंडियाची कमान सांभाळत होता. नोव्हेंबरमध्ये विराटने कर्णधारपद सोडल्यानंतर रोहित टी-20 चा कर्णधार झाला होता. डिसेंबरमध्ये त्याला एकदिवसीय संघाचा कर्णधार बनवण्यात आले आणि फेब्रुवारीमध्ये त्याला कसोटी संघाची कमानही मिळाली आहे. एकूणच भारतीय संघात अवघ्या अडीच महिन्यांसाठी दोन वेगवेगळे कर्णधार होते. दरम्यान, राहुलने चार सामन्यांमध्ये कर्णधारपदही भूषवले, मात्र रोहित आणि विराटच्या अनुपस्थितीत त्याने भारताचे नेतृत्व केले.

Advertisement

धोनी काय म्हणाला?
कसोटी संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर वनडे कर्णधार म्हणून धोनीची कामगिरी काही विशेष नव्हती. एकदिवसीय आणि T20 विश्वचषकातील उपांत्य फेरीतील पराभवासह भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका गमावली होती. या पराभवामुळे धोनीवर बरीच टीका झाली होती. यानंतर तो म्हणाला होता की, भारताकडे दोन वेगळे कर्णधार असू शकत नाहीत. धोनी म्हणाला होता, “मला विभाजित कर्णधारपदावर विश्वास नाही. संघात एकच नेता असावा.” आता पुन्हा एकदा भारतात तिन्ही फॉरमॅटमध्ये एकच कर्णधार करण्यात आला आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply