Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्राचा ‘हा’ खेळाडू वेस्ट इंडिजला देणार धक्का; करणार संघात कमबॅक

मुंबई – भारत आणि वेस्ट इंडिज (IND vs West Indies) यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील (T20 Series) शेवटचा सामना रविवारी (20 फेब्रुवारी) कोलकाता येथे होणार आहे. टीम इंडियाने मालिकेत आधीच 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. एकदिवसीय सामन्यांनंतर आता टी-20 मालिका 3-0 ने जिंकण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. त्याचबरोबर वेस्ट इंडिज संघाला या दौऱ्यातील पहिला सामना जिंकण्याची इच्छा आहे. या सामन्यात दोन्ही संघ अनेक बदलांसह जाऊ शकतात. भारतीय संघ ऋतुराज गायकवाडला प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करू शकतात.

Advertisement

उत्कृष्ट फॉर्ममध्ये असूनही त्याला आतापर्यंत मालिकेत खेळण्याची संधी मिळालेली नाही. ऋषभ पंत आणि विराट कोहली तिसऱ्या टी-20मध्ये खेळणार नाहीत. त्यांना 10 दिवसांचा ब्रेक मिळाला आहे. अशा स्थितीत गायकवाड याला येथे संधी मिळू शकते. ऋतुराजने गेल्या वर्षी श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेतून पदार्पण केले होते. तेव्हापासून त्याला खेळण्याची संधी मिळालेली नाही.

Advertisement

Kharediwala घेऊन आलोय आलेय इंडियन ईकॉमर्स..!

Loading...
Advertisement

गायकवाडचा न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या संघात समावेश होता, मात्र इशान किशनच्या खेळामुळे त्याला वगळण्यात आले. कोहलीच्या अनुपस्थितीत ऋतुराज पुनरागमन करेल आणि तो रोहितसोबत सलामी करू शकेल. इशान किशन तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करून यष्टिरक्षणाची जबाबदारी स्वीकारू शकतो.

Advertisement

ऋतुराजने श्रीलंकेविरुद्धच्या दोन T20 सामन्यांमध्ये 21 आणि 14 धावा केल्या होत्या. यानंतर आयपीएलमध्ये त्याने 16 सामने खेळले आणि सर्वाधिक 635 ​​धावा केल्या. यादरम्यान त्याची सरासरी 45.35 होती. विजय हजारे ट्रॉफीमध्ये ऋतुराजने पाच सामन्यांमध्ये 150.75 च्या सरासरीने 603 धावा केल्या, त्यात चार शतकांचा समावेश आहे.

Advertisement

तिसऱ्या T20 साठी भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
रोहित शर्मा (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, इशान किशन, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर, दीपक चहर, हर्षल पटेल/आवेश खान, भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल, रवी बिश्नोई.

Advertisement
Advertisement

Leave a Reply